Yeola Vidhan Sabha Election Result 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) चर्चा आहे. या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघातून (Yeola Vidhan Sabha Election Results 2024) कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात महायुतीचे छगन भुजबळ हे सुरुवातीला आघाडीवर होते. मात्र आता टपाली मतमोजणीत छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) धक्का बसलाय. महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांनी आघाडी घेतली आहे. 


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा बालेकिल्ला म्हणून येवला विधानसभा मतदारसंघाची (Yeola Assembly Constituency) ओळख आहे. महायुतीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येवला विधानसभेचा गड  छगन भुजबळ राखणार की माणिकराव शिंदे बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.मतमोजणीला सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली आहे. तर पहिल्या कलानुसार या मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी आघाडी घेतली होती. मात्र, आता छगन भुजबळ पिछाडीवर गेले असून माणिकराव शिंदे यांनी टपाली मतदानात 115 मतांनी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या फेरीत  छगन भुजबळ 1300 मतांनी पिछाडीवर आहेत. हा सुरुवातीचा कल असून येवल्यातून कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


2004 पासून छगन भुजबळांचे येवल्यावर वर्चस्व


2004 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार कल्याणराव पाटील यांचा पराभव केला होता. भुजबळ यांना 79 हजार 306 तर कल्याणराव पाटील यांना 43 हजार 657 मते मिळाली होती. 2009 मध्ये भुजबळ यांनी 1 लाख 6 हजार 416 मतं मिळवत शिवसेनेच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला. 2014 सालच्या निवडणुकीत 1 लाख 12 हजार मिळवत छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. पवार यांना या निवडणुकीत 66 हजार 345 मते मिळाली. तर 2019 मध्ये भुजबळ यांनी पुन्हा शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत भुजबळ यांना 1 लाख 26 हजार 237 मते मिळाली. तर पवार यांना 69 हजार 712 मते मिळाली होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


North Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिक, अहिल्यानगरसह उत्तर महाराष्ट्रात कोणाची हवा? निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहा इथे


Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: निकाल लागण्यापूर्वीच ठाकरे आणि शरद पवारांचा मोठा डाव! दगाफटका टाळण्यासाठी फुलप्रुफ सुरक्षा, उमेदवारांकडून शपथपत्र लिहून घेतली