Nagpur District Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Vidhan Sabha Election 2024) चे सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यानं अनुभवलेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतर राज्यातील मतदार राजानं कुणाच्या पदरात मतांचं दान टाकलं? हे आज स्पष्ट होणार आहे. तर राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती सोपवणार? याचा फैसला आज होणार आहे. अशातच, आज राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी आठ वाजता सुरु झाली. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी केली जाणार आहे. मात्र, मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात वेगाने आकडे बदलत आहेत. काहीवेळापूर्वीच पोस्टल मतांची मोजणी संपून आता ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी (EVM Votes Counting) उघडण्यात आली आहे. सुरुवातीच्या कलानुसार नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे प्रत्यक्ष सहाव्यादा निवडनुकीच्या मैदानात उतरले आहेत.


देवेंद्र फडणवीसांसह काँग्रेसचे दिग्गजांची ही आघाडी


तर पहिल्या कलापासून  फडणवीस हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ पहिला राऊंड मध्ये देवेंद्र फडणवीस तीन हजार मतांनी आघाडीवर असलीची माहिती पुढे आली आहे. तर त्या पाठोपाठ पश्चिम नागपूर मधील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे 4,364 मतांनी, उत्तर नागपूर मधून नितीन राऊत पोस्टल मतदानावर आघाडीवर, तर उमरेडमध्ये काँग्रेसचे संजय मेश्राम आघाडीवर असल्याची माहिती पुढे आली आहे.  


 नागपुरातील 12 विधानसभा क्षेत्रांपैकी 11 मतदारसंघात भाजपचाच वरचष्मा असून शिंदेंच्या शिवसेनेला अवघी एक जागा मिळाली आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेसनेही आपले तगडे उमेदवार रिंगणात उतरवर आव्हान दिले आहे. त्यामुळे नागपूरच्या 12 मतदारसंघात महायुती की मविआ बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर हाती आलेल्या कलानुसार आकडेवारी पुढे येते आहे. 


नागपूर - दक्षिण पश्चिम मतदार संघ पहिली फेरी 


भाजपचे देवेंद्र फडणवीस -4716
काँग्रेसचे प्रफुल गुडदे -2467


दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर.


उमरेड मतदार संघ पहिली फेरी 


सुधीर पारवे,(BJP) : 3650
संजय मेश्राम,(congres): 4463
प्रमोद घरडे,(अपक्ष) 2403


पश्चिम नागपूर मतदार संघ पहिली फेरी


विकास ठाकरे - 4364 
सुधाकर कोळे-  4734 
नरेंद्र चिचकार - 415


काटोल विधानसभा पहिली फेरी   


भाजप चरणसिंग ठाकूर  6894 


सलिल देशमुख तुतारी 3486 


चरणसिंग ठाकूर 3408 पहिला राऊंड आघाडी वर


दूसऱ्या राऊंड नंतर भाजपचे चरणसिंग ठाकूर  7662 मतांनी आघाडी वर.


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सलिल देशमुख पिछाडीवर...


आणखी  वाचा