Yavatmal Vidhansabha Results 2024 यवतमाळ : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारंसघ आहेत. वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, अर्णी, पुसद, उमरखेड हे मतदारसंघ आहेत. 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रमुख लढत होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील 7 मतदारसंघांपैकी 6 मतदारसंघात मविआला आघाडी मिळाली होती. दिग्रसच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.
वणी विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार 286025 आहेत. पुरुष मतदारांची संख्या 146332, महिला मतदारांची संख्या 139693 इतकी आहे. वणीत 116191 पुरुष मतदारांनी, 103696 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वणीत एकूण मतदान 219887 इतकं झालं. 76.88 टक्के मतदानाची नोंद वणी विधानसभा मतदारसंघात झाली आहे. या मतदारसंघात भाजपचे संजीवकुमार रेड्डी बोदकुरवर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देरकर यांच्यात लढत झाली.
राळेगाव विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार 288015 आहेत. पुरुष मतदारांची संख्या 145829, महिला मतदारांची संख्या 142186 इतकी आहे. राळेगावात 111389 पुरुष मतदारांनी, 101905 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राळेगावात 213294 एकूण मतदान झालं. 74.06 टक्के मतदानाची नोंद राळेगाव विधानसभा मतदारसंघात झाली आहे. राळेगावात काँग्रेसकडून वसंत पुरके आणि भाजपकडून विद्यमान आमदार अशोक उईके यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे मदन येरावार आणि काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांच्यात लढत झाली.या विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार 371279 आहेत. पुरुष मतदारांची संख्या 187529, महिला मतदारांची संख्या 183716 इतकी आहे. या मतदारसंघात तृतीयपंथी मतदारांची संख्या 34 इतकी आहे. यवतमाळमध्ये 122266 पुरुष मतदारांनी, 113854 महिला मतदारांनी, तर 11 तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यवतमाळमध्ये 236131 एकूण मतदान झालं.63.60 टक्के मतदानाची नोंद यवतमाळ विधानसभा मतदारसंघात झाली आहे.
दिग्रस विधानसभा मतदारसंघाची लढत राज्यभर चर्चेत ठरली. दिग्रसमध्ये काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे आणि शिवसेना पक्षाकडून संजय राठोड रिंगणात होते. या विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार 345869 आहेत. पुरुष मतदारांची संख्या 177570, महिला मतदारांची संख्या 168286 इतकी आहे. या मतदारसंघात तृतीयपंथी मतदारांची संख्या 13 इतकी आहे. दिग्रसमध्ये 137684 पुरुष मतदारांनी, 124173 महिला मतदारांनी, तर 10 तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दिग्रसमध्ये 261867 एकूण मतदान झालं.75.71 टक्के मतदानाची नोंद दिग्रस विधानसभा मतदारसंघात झाली आहे.
आर्णी विधानसभा मतदारसंघाची लढत राज्यभर चर्चेत ठरली. आर्णीमध्ये काँग्रेसकडून जितेंद्र मोघे आणि भाजपकडून राजू तोडसाम रिंगणात होते. या विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार 322023 आहेत. पुरुष मतदारांची संख्या 164129, महिला मतदारांची संख्या 157890 इतकी आहे. या मतदारसंघात तृतीयपंथी मतदारांची संख्या 4 इतकी आहे. आर्णीमध्ये 122297 पुरुष मतदारांनी, 111726 महिला मतदारांनी, तर 2 तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आर्णीमध्ये 234025 एकूण मतदान झालं.72.67 टक्के मतदानाची नोंद आर्णी विधानसभा मतदारसंघात झाली आहे.
पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंद्रनील नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शरद मेंद रिंगणात होते. या विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार 321826 आहेत. पुरुष मतदारांची संख्या 165539, महिला मतदारांची संख्या 156280 इतकी आहे. या मतदारसंघात तृतीयपंथी मतदारांची संख्या 7 इतकी आहे. पुसदमध्ये 109660 पुरुष मतदारांनी, 102294 महिला मतदारांनी, तर 6 तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुसदमध्ये 211960 एकूण मतदान झालं.65.86 टक्के मतदानाची नोंद पुसद विधानसभा मतदारसंघात झाली आहे.
उमरखेड मतदारसंघात भाजपनं किसन वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसनं या मतदारसंघात साहेबराव कांबळे यांना रिंगणात उतरवलं होतं. या विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार 317134आहेत. पुरुष मतदारांची संख्या 163470 आहे.महिला मतदारांची संख्या 153661 इतकी आहे. या मतदारसंघात तृतीयपंथी मतदारांची संख्या 3 इतकी आहे. उमरखेडमध्ये 114215 पुरुष मतदारांनी, 104438 महिला मतदारांनी, तर 1 तृतीयपंथी मतदारनं मतदानाचा हक्क बजावला. उमरखेडमध्ये 218654 एकूण मतदान झालं.68.95 टक्के मतदानाची नोंद उमरखेड विधानसभा मतदारसंघात झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी
वणी :
राळेगाव:
यवतमाळ :
दिग्रस :
आर्णी :
पुसद :
उमरखेड :
यवतमाळ जिल्ह्यातील 2019 मध्ये विजयी झालेल्या आमदारांची यादी (Yavatmal MLA List)
वणी :संजीव रेड्डी बापुराव बोदकुरवार (भाजप)
राळेगाव: अशोक रामाजी उईके (भाजप)
यवतमाळ : मदन येरावार (भाजप)
दिग्रस : संजय राठोड (शिवसेना)
आर्णी : संदिप धुर्वे (भाजप)
पुसद : इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
उमरखेड : नामदेव ससाणे (भाजप)
Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.
इतर बातम्या: