Jalgaon Maharashtra Election Results 2024 Winners List:: महाराष्ट्रात (Maharashtra District Vidhan Sabha Election 2024) यंदा एकाच टप्प्यात मतदान पार पडले आहे. 20 नोव्हेंबरला सर्व विधानसभांमध्ये मतदान झाले असून आज 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होत आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एकूण 11 मतदार संघ असून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि चर्चेचे मतदारसंघ आहेत. जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदार संघात सर्वच ठिकाणी महा युतीचे उमेदवार विजय झाले आहेत, जाणून घेऊया जळगाव जिल्ह्यातील कुठल्या मतदारसंघात कोणी विजयाचा गुलाल उधळला...


11 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचं पारडं जड!


सध्याचे 2024 चे चित्र पाहता जळगाव जिल्ह्यातील 11 पैकी 6 मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याचं दिसून आलं होतं. या बंडखोरांना माघारी घेण्यासाठी महायुतीपुढं तसं मोठं आव्हान होतं. मात्र, अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्यात मंत्री गिरीश महाजन यांना अपयश आल्याचं दिसून आलं. पण, आता याच जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांही महायुतीचं पारडं जड ठरलंय.


जळगाव जिल्ह्यातील 11 मतदार संघात सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी  झाले आहेत


सुरेश भोळे - भाजप - जळगाव शहर
गुलाबराव पाटील - शिंदे गट -  जळगाव ग्रामीण
गिरीश महाजन - भाजपा - जामनेर
अनिल पाटी - राष्ट्रवादी - अजित दादा गट - अमळनेर
किशोर पाटील - शिंदे गट - पाचोरा
चंद्रकांत सोनावणे - शिंदें गट - चोपडा
मंगेश चव्हाण - भाजप -चाळीसगाव
अमोल जावळे - भाजप - रावेर -  
संजय सावकारे - भाजप - भुसावळ
चंद्रकात पाटील - शिंदे गट - मुक्ताई नगर
अमोल पाटील, शिंदे गट- एरंडोल


जळगाव जिल्ह्यात अकरा मतदार संघ आहेत, यामधील प्रमुख लढती जाणून घ्या


जळगाव शहर मतदारसंघ


या मतदार संघात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे विजयी झालेत. त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती तर भोळे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या (उबाठा) जयश्री महाजन रिंगणात होत्या. तर कुलभूषण पाटील आणि मनसे डॉ. अनुज पाटील यांच्यात प्रमुख लढत होती. उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेचे कुलभूषण पाटील हे अपक्ष रिंगणात होते. 


जामनेर मतदार संघ


जामनेर मतदारसंघातून भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांचा दणदणीत विजय झाला आहे. महाजन यांच्या विरूद्ध महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे रिंगणात होते.


जळगाव ग्रामीण मतदार संघ


महायुतीचे  उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांचा विजय झाला आहे, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर रिंगणात होते.


अमळनेर मतदार संघ


महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील विजयी झाले आहेत. यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉ अनिल शिंदे, त्याचबरोबर भाजपचे बंडखोर नेते अपक्ष शिरीष चौधरी रिंगणात होते.


पाचोरा मतदार संघ


महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील विजयी झालेत. यांच्या विरुद्ध त्यांच्या भगिनी शिवसेना (उबाठा) वैशाली सूर्यवंशी, बंडखोर दिलीप वाघ, अमोल शिंदे यांच्यात चौरंगी लढत झाली.


एरंडोल विधानसभा मतदारसंघ


एरंडोल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अमोल चिमणराव पाटील विजयी झालेत. यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) डॉ सतीश पाटील रिंगणात होते. तर या निवडणुकीत शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख हर्षल माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. संभाजी पाटील, भाजपाचे माजी खासदार एटी नाना पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमित पाटील हे अपक्ष म्हणून लढले.


चोपडा विधानसभा मतदारसंघ


पडा विधानसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यांचा विजय झालाय. यांच्या विरुद्ध शिवसेनेचे (उबाठा) प्रभाकर सोनवणे यांच्यात लढत झाली.


चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ 


हा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी उन्मेष पाटील यांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केल्याचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. आता चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण विजयी झालेत. त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार उन्मेष पाटील यांच्यात थेट लढत पार पडली. 


मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ 


मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील विजयी झालेत, तर महाविकास आघाडी तर्फे एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे या दुसऱ्यांदा अपयशी ठरल्या आहेत. यांच्याविरुद्ध अपक्ष विनोद सोनवणे यांच्यात लढत होणार आहे.


भुसावळ विधानसभा मतदारसंघ 


जळगाव जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघाची चर्चा आहे. कारण भुसावळमध्ये भाजपाचे आमदार संजय सावकारे विजयी झाले आहेत. यांच्याविरुद्ध काँग्रेसचे राजेश मानवतकर यांच्यात थेट लढत झाली आहे. 


रावेर विधानसभा मतदारसंघ 


रावेर मतदारसंघ भाजपाचे हरिभाऊ जावडे यांचे पुत्र अमोल जावळे यांचा विजय झाला आहे, त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे धनंजय चौधरी, तर प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी, वंचित बहुजन आघाडीच्या शमिभा पाटील, काँग्रेसचे (अपक्ष म्हणून लढणार) दारा मोहम्मद अशी लढत झाली होती


 


हेही वाचा>


Jalgaon Jamod Assembly Election 2024 : विधानसभेची खडाजंगी : जळगाव जामोद मतदारसंघात तिरंगी लढत, संजय कुटे की स्वाती वाकेकर कोण बाजी मारणार ?