Ashok Hinge Resignation : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) मोठा धक्का बसला आहे. मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे (Ashok Hinge) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतल्याने अशोक हिंगे नाराज होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे.


बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे यांनी निवडणूक देखील लढवली होती. मात्र कार्यकारणीच्या मागणीमुळे सामाजिक दृष्ट्या पक्षात काम करणे अडचणीचे ठरत असल्याचे सांगत अशोक हिंगे यांनी मराठवाडा अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे दिला आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय अशातच वंचित बहुजन आघाडीने बीड जिल्ह्यात गेवराई, आष्टी आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार देखील जाहीर केले आहे.


आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.  भाजपसह, शिवसेना शिंदे गट, राष्टरवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तसेचट मनसे आणि वंचित बहुन आघाडीने देखील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. अद्यापही काही जागांवर टिढा कायम असल्याचं चित्रक पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये जागावटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Maratha Reservation: बीडमध्ये वेगळाच ट्विस्ट, वंचितच्या उमेदवाराचं आरक्षणावर शपथपत्र; मनोज जरांगेना भेटणार