Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वात प्रथम भाजपकडून 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर काल शिवसेनेने (शिंदे गट) देखील 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. मात्र आज भाजपकडून दुसरी यादी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु अजूनही महायुतीमधील 18 जागांवर पेच कायम असल्याचं समोर येत आहे. 


महायुतीतील (Mahayuti) जागावाटपाचा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) तिढा अजूनही काही जागांवरील सुटलेला नाही. भाजपकडून 99, शिवसेनेनं 45, तर अजित पवार यांनीही काही उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. बंड शमवण्यासाठी या जागा जाहीर करण्यास महायुतीकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमधील जागांचा तिढा कायम असून काही जागांवर वेट ॲंड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे. तर काही जागांवर महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार असणार? त्यावर महायुतीकडून उमेदवार निवड ठरणार असल्याची माहिती मिळत आहे. 


कोणत्या जागांवर पेच कायम आहे?


मुंबईतील जागा-
 
अंधेरी पूर्व - भाजप आणि शिवसेना दोघांचाही दावा 
चेंबूर - शिंदेंचा दावा मात्र भाजप देखील मागत आहे 
दिंडोशी - भाजप आणि शिवसेनेकडून दावा
कलिना - शिवसेना, भाजप दावा 
वरळी - शिवसेना, भाजपचा दावा 
वर्सोवा - भाजप आणि सेना दोघांचाही दावा 
शिवडी - सेना आणि भाजप 
धारावी - शिवसेनेचा दावा मात्र भाजपची देखील मागणी - गेल्या वेळेस भाजपनं लढली होती 


ठाणे


मिरा भाईंदर - गीता जैन - भाजपच्या नरेंद्र मेहता देखील इच्छुक 


कोल्हापूर - 


कोल्हापूर उत्तर - कृष्णराज महाडिकसाठी भाजपचा दावा तर शिवसेनेकडून राजेश श्रीरसागर इच्छुक 


सिंधुदुर्ग


कुडाळ विधानसभा - आता शिवसेनेकडेच राहणार 


रत्नागिरी


गुहागर - शिवसेना आणि भाजपकडूनही जोरदार तयारी 


सोलापूर


करमाळा - अपक्ष संजय शिंदे - मात्र भाजपकडून उमेदवार देण्याची तयारी 


बार्शी - अपक्ष उमेदवार - भाजप दावा 


अहमदनगर


कोपरगाव - अजित पवार गट - स्नेहलता कोल्हे पाटील दावा (भाजप) 


परभणी


गंगाखेड (रासपकडे असलेल्या जागेवर भाजप लढण्याची शक्यता) 


नांदेड


लोहा (प्रतापराव चिखलीकरांसाठी भाजपचा दावा) 


अमरावती


बडनेरा (अपक्ष) - भाजपच्या उमेदवाराकडून देखील मागणी 


अकोला


बाळापूर - भाजपच्या माजी आमदारांकडून मागणी - भाजपचा दावा


संबंधित बातमी:


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन मरेन, शहाजीबापू पाटलांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज