बीड: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर आता सर्वत्र प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी कालपासून (मंगळवार) परळी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराला मोठी सुरुवात केली. आपल्या पहिल्याच जाहीर सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी माझा पराभव करण्यासाठी व्युहरचना केली जात असून गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा नेमका रोख कुणावर? हा सवाल उपस्थित होतो आहे. मी अडचणीचा ठरू शकतो म्हणून माझा अस्त करण्याची तयारी सुरू आहे. तर लोकसभेत पंकजा ताईंचा जसा पराभव केला तसा विधानसभेत माझा पराभव करण्यासाठी व्युहरचना केली जात असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. 


धनंजय मुंडे यांनी मंगळवारपासून परळी विधानसभा मतदारसंघात धुमधडाक्यात निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. पहिल्याच जाहीर भाषणात धनंजय मुंडे यांनी माझा पराभव करण्यासाठी व्युहरचना केली जात असल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा नेमका रोख कुणावर? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.


परळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी परळीतील व्यापारांशी संवाद साधला. दरम्यान झालेल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी मला दोन निवडणुकीचा मुहतोड जवाब द्यायचा आहे, असं म्हटलं आहे. मी अडचणीचा ठरू शकतो म्हणून माझा अस्त करण्याची तयारी सुरू आहे. तर लोकसभेत पंकजा ताईंचा जसा पराभव केला तसा विधानसभेत माझा पराभव करण्यासाठी व्युहरचना केली जात असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा रोख नेमका कुणावर? असा सवाल उपस्थित होत आहे.


नेमकं काय म्हणालेत धनंजय मुंडे? 


आपल्या भाषणावेळी धनंजय मुंडे म्हणाले, 'मला कधी-कधी कळत नाही. छोट्या घरात जन्माला आलेल्या माझ्यासारख्याची काय कोणाला एवढी भीती असेल. तुम्ही सांगा, तुम्हाला भीती नाही ना. मग बाहेरच्यांना का भीती वाटावी, का अशी व्युहरचना करावी. लोकसभेत ताईचा गेम केला आता माझा गेम करायचा. ही व्युहरचना कशासाठी, का माझी भीती आहे का यांना, असं वाटतं महाराष्ट्रामध्ये काम करणारा एखादा व्यक्ती उद्या त्यांना अडचणीचा ठरू शकतो, म्हणून आत्ताच त्याचा व्युहरचना करून राजकीय अस्त करा. ही भीती धनंजय मुंडेची नाही. ही भीती जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाची आहे. ती भीती त्यांना आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत, मात्र, त्यांनी यावेळी भाषणात कोणाचंही नाव न घेतल्याने त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, या बाबतचे तर्क वितर्क लावले जात आहेत.


मला संपवणारा माझं नाव संपवेल. पण त्या नावाच्या मागे ताकद तुमची आहे. ती ताकद त्यांना संपवावी लागणार आहे. आपल्या मातीच्या या नेतृत्वाला त्यांना संपवावं लागेल, जात-पात, धर्म याचा कधी मी आयुष्यात विचार केला नाही. माझ्यासाठी निवडणुकीची ज्या दिवशी आचारसंहिता चालू होईल त्या दिवसापासून राजकारण चालू झालं. ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी माझं राजकारण संपलं, नंतर कोणीही या मी त्यांच्या कामासाठी आहे, असंही मुंडे पुढे म्हणालेत.