Narendra Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. एसपी कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. यासाठी शहरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मोदींना पाहण्यासाठी पुणेकर गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अलका टॉकीज चौकात आणि काही महत्त्वाच्या रस्त्यांवर लाकडी बॅरिगेटिंग करण्यात आली आहे.


असे असतील वाहतुकीत बदल


शहरातील सदाशिव पेठेतील विजयानगर काॅलनी भागातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद
वाहनचालकांनी ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून निलायम चित्रपटगृहमार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगडरस्त्याकडे जावे. नाथ पै चौकातून वाहनचालकांनी सरळ सिंहगड रस्त्याकडे जावे.


बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद.वाहनचालकांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय चौकातून डावीकडे वळून जाॅगर्स पार्कमार्गे शास्त्री रस्त्याकडे जावे. तेथून इच्छितस्थळी जावे.


मध्यभागातील वाहतूक बदल


टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.


वाहनचालकांनी काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रीज) डावीकडे वळून भिडे पुल चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
गरुड गणपती चैाक ते भिडे पूल चौक दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे.


वाहनचालकांनी गरुड गणपती चौकातून डावीकडे वळून टिळक चौकातून वळून केळकर रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.


डेक्कन जिमखाना परिसरातून भिडे पूलमार्गे केळकर रस्त्यावर येण्यास वाहनांना मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी नदीपात्रातील रस्त्याने इच्छितस्थळी जावे.


नो पार्किंग झोन


संध्याकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत जंगली महाराज रस्ता ... शास्त्री रोड.. फर्ग्युसन रस्ताटिळक रोड ..या मार्गावर कोणत्याही प्रकारचे वाहने लागण्यास मनाई करण्यात आली आहे