Raj Thackeray On Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल दिंडोशी मालाड येथे जाहीर दिंडोशी विधानसभेचे उमेदवार भास्कर परब यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. 


राज्यात पाच वर्षांत जे काही घडलं ते तुम्ही पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडणूक चिन्ह गेले. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत खान राहिले आहेत. वर्सोव्यात हारून खान यांना तिकीट दिले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवाराने उर्दुमध्ये पत्रक काढले आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली. मराठवाड्यामध्ये स्लोगन चालायचं बाण हवा की खान... दुर्दैव असं झालं उद्धव ठाकरे कडून बाण निघून गेला उरले फक्त खान...शिवसेना ठाकरे गटाचा वर्सोवाचा उमेदवार असलेल्या हरून खानच्या नावातच हरू आहे...त्यामुळे तो जिंकणार कसा?, असा सवाल राज ठाकरेंनी केला. 


शिवाजी पार्कवरील लाईट बंद, राज ठाकरे आक्रमक


आपण तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी साजरी करतो. दादरमधील छत्रपती शिवाजी पार्कवर आपण 14-15 वर्षांपासून दीपउत्सव साजरा करतो. मात्र काल अचानक सगळे लाईट बंद करुन टाकले. 14 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कला सभा आहे. त्यामुळे ते लाईट काढून टाकले आहेत, असं राज ठाकरेंनी सांगितले. हिंदूंच्या सणावर बंदी आणली होती, तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली होती. हिंदुत्ववादी पंतप्रधान शिवाजी पार्कवर येत आहेत आणि त्यांच्यासमोर तुम्ही दिवे बंद करतात. राहुल गांधी असते तर समजू शकलो असतो. राहुल गांधी यांच्या डोक्यात दिवे पेटत नाही. उद्धव ठाकरे यांना लाईट कमी लागतो आणि त्याहून हिंदूंचा, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. 


मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळणार?


विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना IANS-MATRIZE च्या सर्व्हेची आकडेवारी समोर आलेली आहे. महाविकास आघाडीत मुंबईत सर्वाधिक जागा लढवणाऱ्या  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 5-9 च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 4-8 च्या दरम्यान जागा मिळू शकतात. याशिवाय  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला 0-4 च्या दरम्यान जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समाजवादी पार्टीला 0-4 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीला मुंबईत 41 टक्के मतं मिळू शकतात तर त्यांना 10-13 दरम्यान जागा मिळतील, असा अंदाज  IANS- MATRIZE चा आहे. महायुतीमध्ये भाजपला 13-17 दरम्यान जागा मिळू शकतात, असा अंदाज IANS- MATRIZE नं वर्तवला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत 7-11 च्या दरम्यान  जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1-5 च्या दरम्यान जागा मिळतील,  असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  महायुतीला मुंबईत 21-26 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महायुतीला 47 टक्के मिळू शकतात, असा सर्व्हेचा अंदाज आहे. मुंबईत मनसेला 0-4 दरम्यान जागा मिळू शकतात आणि इतरांना 0-4 जागा मिळू शकतात, असा अंदाज IANS- MATRIZE नं वर्तवला आहे.




संबंधित बातमी:


Raj Thackeray: हिंदुत्ववादी पंतप्रधान शिवाजी पार्कवर येताय अन्...; राज ठाकरे आक्रमक, उद्धव ठाकरे, राहुल गांधींवरही हल्लाबोल