पुणे: राज्यात आज 288 विधानसभेच्या जागांसाठी मतदान पार पडत आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहेत. सर्व नेते, कलाकार नागरीकांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील भोसरी मतदारसंघामध्ये (Bhosari Assembly constituency) अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भोसरी विधानसभेतील साडे सात हजार मतदारांची नावं अचानकपणे गायब झाली आहेत. त्यानंतर मतदारांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 


आठवड्याभारपूर्वी मतदार यादीत असणारी नावं डिलीट झाल्याचा आणि हडपसर, बारामती अशा विविध विधानसभेत नावं टाकल्याचा, दावा मतदारांनी केला आहे. यामागे सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत असल्याचा आरोप या मतदारांकडून करण्यात आला आहे. ही साडे हजार मतं एखाद्या उमेदवाराला विजयी करू शकतात. हे पाहता घडल्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


भोसरी विधानसभेतील साडे सात हजार मतदारांची नावं अचानकपणे गायब झाली आहेत. हा मतांचा आकडा मोठा आहे, त्यामुळे ही नावं कशी गायब झाली याबाबत संशय व्यक्त केले जात आहेत, त्याचबरोबर यामागे सत्ताधाऱ्यांचा हात असल्याचा आरोप देखीलया संतप्त मतदारांनी केला आहे.


राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 32.18 टक्के मतदान झाले आहे. राज्यातील नागरिकांना घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन नेतेमंडळी, कलाकार करताना दिसत आहेत. 


राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:


अहमदनगर -  32.90 टक्के,
अकोला - 29. 87टक्के,
अमरावती - 31.32टक्के, 
औरंगाबाद- 33.89 टक्के, 
बीड - 32.58 टक्के, 
भंडारा- 35.06 टक्के, 
बुलढाणा- 32.91 टक्के, 
चंद्रपूर- 35.54 टक्के,
धुळे - 34.05 टक्के, 
गडचिरोली-50.89 टक्के, 
गोंदिया - 40.46 टक्के, 
हिंगोली -35.97 टक्के, 
जळगाव - 27.88 टक्के, 
जालना- 36.42 टक्के, 
कोल्हापूर- 38.56 टक्के,
लातूर - 33.27 टक्के, 
मुंबई शहर- 27.73 टक्के, 
मुंबई उपनगर- 30.43 टक्के,
नागपूर - 31.65 टक्के,
नांदेड - 28.15 टक्के, 
नंदुरबार- 37.40 टक्के,
नाशिक - 32.30 टक्के, 
उस्मानाबाद- 31.75 टक्के, 
पालघर-33.40 टक्के, 
परभणी-33.12 टक्के,
पुणे - 29.03 टक्के,
रायगड - 34.84 टक्के, 
रत्नागिरी-38.52 टक्के,
सांगली - 33.50 टक्के,
सातारा -34.78 टक्के, 
सिंधुदुर्ग - 38.34 टक्के,
सोलापूर - 29.44 टक्के,
ठाणे -28.35 टक्के, 
वर्धा - 34.55 टक्के,
वाशिम - 29.31 टक्के,
यवतमाळ -34.10 टक्के मतदान झाले आहे.