पुणे: पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. 2019 चंद्रकांत पाटील या मतदार संघातून निवडून आले होते. या मतदारसंघातून पुन्हा एकदा महायुतीकडून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी आमदार असलेल्या चंद्रकांत मोकाटे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कोथरूड मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार ठरला असून पुन्हा एकदा चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, पुण्यातून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत मोकाटे यांना ए बी फॉर्म देण्यात आला आहे. मातोश्री वरती उद्धव ठाकरे यांनी मोकाटे यांना ए बी फॉर्म दिला आहे. कोथरूडमध्ये चंद्रकांत मोकाटे विरुद्ध चंद्रकांत पाटील असा सामना होणार आहे.
कोथरुड मतदारसंघात काय परिस्थिती?
शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना पुन्हा एकदा कोथरूड मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेकडून अॅड. किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात तुल्यबळ नेता नसल्याने पुन्हा एकदा चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघाच तिहेरी लढत होणार आहे.