मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला रविवारी म्हणजे आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. आज कोणत्याही परिस्थितीत महायुतीच्या जागावाटपाचा (Mahayuti Seat Sharing) तिढा मिटणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महायुतीचा मुंबईसहित सर्व जागांचा तिढा मिटणार असल्याची माहिती आहे.


महायुतीच्या किती जागा बाकी ?



भाजप 
99 + 22 = 121


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 
38 + 11 + 4 = 53


शिवसेना (शिंदे) 
45 = 45


एकूण 288 - 215 = 73 बाकी


मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांची यादी


1. बोरीवली  - उमेदवार ठरला नाही
2. दहिसर विधानसभा : मनिषा चौधरी (भाजप)
3. मागाठणे विधानसभा : प्रकाश सुर्वे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
4. मुलुंड विधानसभा : मिहीर कोटेचा (भाजप)
5. विक्रोळी विधानसभा : अद्याप उमेदवार ठरला नाही 
6. भांडुप पश्चिम विधानसभा : उमेदवार ठरला नाही 
7. जोगेश्वरी पूर्व विधानसभा : मनिषा वायकर (शिवसेना - एकनाथ शिंदे) 
8. दिंडोशी विधानसभा : उमेदवार ठरला नाही 
9. कांदिवली पूर्व विधानसभा : अतुल भातखळकर (भाजप)
10. चारकोप विधानसभा : योगेश सागर (भाजप)
11. मालाड पश्चिम विधानसभा : विनोद शेलार
12. गोरेगाव विधानसभा : विद्या ठाकूर (भाजप)
13. वर्सोवा विधानसभा : उमेदवार ठरला नाही 
14. अंधेरी पश्चिम विधानसभा : अमित साटम (भाजप)
15. अंधेरी पूर्व विधानसभा : उमेदवार अद्याप जाहीर नाही 
16. विलेपार्ले विधानसभा : पराग अळवणी (भाजप)
17. चांदिवली विधानसभा : दिलीप लांडे (शिवसेना : एकनाथ शिंदे)
18. घाटकोपर पश्चिम विधानसभा : राम कदम (भाजप)
19. घाटकोपर पूर्व विधानसभा : उमेदवार जाहीर नाही 
20. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा : उमेदवार निश्चिती नाही 
21. अणूशक्तिनगर विधानसभा : सना मलिक (राष्ट्रवादी अजित पवार)22.  चेंबुर विधानसभा : उमेदवार जाहीर नाही 
23. कुर्ला विधानसभा : मंगेश कुडाळकर (शिवसेना : एकनाथ शिंदे)
24. कलिना विधानसभा : उमेदवार जाहीर नाही 
25. वांद्रे पूर्व विधानसभा :  झिशान सिद्दीकी (राष्ट्रवादी अजित पवार)
26. वांद्रे पश्चिम विधानसभा : आशिष शेलार (भाजप)
27. धारावी विधानसभा : उमेदवार निश्चिती नाही
28. सायन कोळीवाडा विधानसभा : कॅप्टन तमिळ सेल्वन (भाजप)
29. वडाळा विधानसभा : कालिदास कोळंबकर (भाजप)
30. माहिम विधानसभा : सदा सरवणकर (शिवसेना : एकनाथ शिंदे)
31. वरळी विधानसभा : उमेदवार ठरला नाही 
32. शिवडी विधानसभा : उमेदवार ठरला नाही 
33. भायखळा विधानसभा : यामिनी जाधव (शिवसेना : एकनाथ शिंदे)
34. मलबार हिल विधानसभा : मंगल प्रभात लोढा (भाजप)
35. मुंबादेवी विधानसभा : उमेदवार निश्चिती नाही 
36. कुलाबा विधानसभा : राहुल नार्वेकर (भाजप)


आणखी वाचा


मोठी बातमी! अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, निलेश लंकेंच्या पत्नीविरुद्ध उमेदवार ठरला