Parli Assembly constituency : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी 2019 च्या वचननाम्यातील शब्द पाच वर्षात पाळले नाहीत, मंत्रीपदाचा फायदा फक्त वैयक्तिक झाला. धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुनील गुट्टे यांनी केला. शेतकरी संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत
शरद पवार गटाचे नेते सुनील गुट्टे म्हणाले की, धनंजय मुंडेंचा वचन नामा फेल झाला. परळी मतदारसंघात शेतकरी बेरोजगार विद्यार्थी सर्वांचे प्रश्न तसेच आहेत. शंभर टक्के लोकांचा विकास झालेला नाही. मूलभूत प्रश्न तसेच आहेत. मतदारसंघात मोठी दादागिरी आहे. 354 कलम इथल्या सगळ्या लोकांना माहित आहे. अनेक लोक जेलमध्ये गेले आहेत. परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत आहे. 2019 च्या वचननाम्यातील वचनांची काय पूर्तता केली हे जाहीर भाषणातून सांगावे असे आव्हा आवाहन गुट्टे यांनी दिले.
राजेभाऊ फड, सुनील गुट्टे, संजय दौंड यांचे नाव आघाडीवर
दुसरीकडे, मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाकडून त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची चाचपणी सुरू आहे. यामध्ये राजेभाऊ फड, सुनील गुट्टे, संजय दौंड यांचे नाव आघाडीवर आहे. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे सुनील गुट्टे पुत्र आहेत. त्यांनी देखील परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी केली असून मुंडेंविरोधात दंड थोपटले आहेत.
लोकसभा निवडणुकीत काय घडलं?
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून बजरंग सोनवणे उभे होते. महायुतीकडील आमदारांची संख्या पाहता पंकजा मुंडे यांचं पारडं वरचढ वाटत होतं. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का बसला आणि बजरंग सोनवणे खासदार म्हणून विजयी होत लोकसभेत गेले. पंकजा मुंडे यांना माजलगाव, आष्टी आणि परळी या 3 विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली. तर, बजरंग सोनवणे यांना गेवराई, बीड आणि केज मतदारसंघातून मताधिक्य मिळालं. केज आणि गेवराई या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असून देखील बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गेवराई मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना 39 हजारांची लीड, केजमधून 13 हजारांचे मताधिक्य आणि बीड विधानसभा मतदारसंघातून सोनवणे यांना 61 हजारांचा लीड मिळाला आहे. तर, पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघात तब्बल 74 हजारांचा लीड मिळाला आहे, याशिवाय माजलगाव मतदारसंघात अवघ्या 935 मतांचे मताधिक्य पंकजा मुंडेंना आहे. तसेच, आष्टी मतदारसंघातून पंकजा यांना 32 हजारांचे मताधिक्य आहे. येथील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे 6550 मतांनी विजयी झाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालात मतदारांनी दिलेला कौल पाहता विधानसभा निवडणूक देखील चुरशीची होत आहे. बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट याही निवडणुकीत दिसून येईल.
इतर महत्वाच्या बातम्या