मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील सर्वच पक्ष निवडणुकीच्या प्रचाराच्या कामात गुंतले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवामधून धडा घेत भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी सावधपणे पाऊल टाकलं जात आहे. आतापर्यंत भाजपने 152 जणांना उमेदवारी दिली आहे. अद्याप काही जागांचा तिढा आहेच. या दरम्यान भाजपच्या एका बड्या नेत्याने विधानसभेत किती आमदार निवडून येणार याचा आकडाच सांगितला. भाजपला 110 ते 115 जागा मिळणार असल्याचा मोठा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.
मोहित कंबोज यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर या संदर्भात एक पोस्ट केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 110 ते 115 जागा जिंकणार असल्याचा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. 23 नोव्हेंबर रोजी भाजप कार्यालयात पुन्हा दिवाळी साजरी होणार आहे. निवडणुकीआधीच मोहित कंबोज यांनी दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. 152 जागांपैकी भाजप 110 ते 1110 जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे.
महायुतीचा फॉर्म्युला अजूनही निश्चित नाही. आतापर्यंत 288 पैकी 282 जागांवरचे उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजप 146,शिवसेना 78,राष्ट्रवादीचे 51 उमेदवार जाहीर झाले. महायुतीत चार मित्र पक्षांच्या वाट्याला 7 जागा दिल्या. महायुतीच्या 7 जागांवर अजून उमेदवारांची घोषणा नाही. महायुतीचे उमरेड,मालेगाव मध्य,मीरा भायंदर,शिवडीचे उमेदवार बाकी आहेत. महायुतीचे मानखुर्द-शिवाजीनगर,बीड आणि माढ्याचे उमेदवार बाकी आहेत. महायुतीत मित्रपक्षांना 7 जागा जाहीर झाल्या आहेत. रिपाइं,जनसुराज्यला 2-2 जागा राजश्री शाहू आघाडी,युवा स्वाभिमानी आणि रासपला प्रत्येकी एकेक जागा दिल्या आहेत.
15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली
राज्यात 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली. 29 उमेदवारी अर्ज दाखल अंतिम तारीख होती. तर आज 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जांची छाननी झाली. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल.
हे ही वाचा :
Ravi Raja resigns: विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का,निष्ठावंत नेत्याचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार