Jalna Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच ज्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज मिळाले नाहीत, त्यांनी अपक्ष उमेवारी अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे. अशातच जालना विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीत बंडखोरी झाली आहे. जालन्यातून माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवेंनी (Bhaskar Danve) अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. 


मैत्रिपूर्ण लढतीसाठी आम्ही आग्रही 


दरम्यान, भास्कर दानवे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पदावर आहेत. भाजप कार्यकर्त्यांसोबत दुचाकी रॅली काढत भास्कर दानवेंनी अर्ज भरला आहे. मैत्रिपूर्ण लढतीसाठी आम्ही आग्रही असल्याची भूमिका भास्कर दानवे यांनी घेतली आहे. दरम्यान, जालना विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाला सुटला आहे. त्यामुळं या मतदारसंघातून अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, या जागेवर भाजपने देखील दावा केलाय. त्यामुळं या जागेवरुन मबहायुतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झालीय. 


 भाजपला ही जागा सोडतील असी आशा 


जालन्यात महायुती मध्ये बंडखोरी पाहायला मिळत आहेत. शिवसेनेकडून अर्जून खोतकरांचे नाव जाहीर झाले असतानाच, भाजपकडून रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भास्कर दानवे हे भाजपच्या जिल्हाउपाध्यक्ष पदावर आहेत. जालन्याची जागा ही महायुतीत भाजपला सोडण्यात यावी यासाठी दानवे आग्रही होते. मात्र ही जागा परंपरागत शिवसेनेकडे असल्यानं खोतकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी निवडणूक लढवण्यावर ठाम असलेले भास्कर दानवे यांनी भाजप  कार्यकर्त्यांसह दुचाकी रॅली काढत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज भरायला आणखी चार दिवस बाकी असून अजूनही भाजपला ही जागा सोडतील अशी आशा भास्कर दानवे यांनी व्यक्त केली आहे. 


काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल हे पुन्हा मैदानात


स्टील सिटी, बियाणांची पंढरी, मोसंबी मार्केट आणि व्यापार पेठ अशी चौफेर ओळख असलेल्या जालना विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व राखण्यासाठी सर्वच पक्ष या निवडणुकीत जोमाने कामाला लागलेत. संमिश्र सामाजिक स्थिती आणि बदलत्या राजकीय स्थितीमुळे जालना विधानसभा मतदारसंघ आतापर्यंत कोणाचाही बालेकिल्ला होऊ शकलेला नाही. 70 टक्के शहरी 30 टक्के ग्रामीण भाग असलेल्या या मतदारसंघात 2009 पासून काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल (Kailash Gorantyal) आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) अशीच दुहेरी लढत होत आलेली आहे. तेव्हापासून आलटून पालटून या दोन्ही उमेदवारांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. कैलास गोरंट्याल हे देखील यावेळी पुन्हा मैदानात उतरले आहेत.