मुखेड: माणसाची औलाद आहे की कुत्र्याची अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी सचिव बालाजी खतगावकर यांनी भाजपचे आमदार तुषार राठोड यांच्यावर केली आहे. बालाजी खतगावकर मुखेड मधून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. एका प्रचार सभेच्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले असून हा त्यांटा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या आणि मुखेड मतदार संघात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. बालाजी खतगावकर हे बाहेरचे उमेदवार आहेत अशी टीका त्यांचे विरोधक करत आहेत. यावर खतगावकर यांचा संयम सुटला आणि त्यांनी ही टीका केली. कुत्रे एकमेकांना गल्लीत येऊ देत नाहीत, आपण माणसे आहोत असेही खतगावकर म्हणाले. 


माणसाची औलाद आहे की कुत्र्याची औलाद आहे. कुत्रे गल्लीमध्ये एकमेकांना येऊ देत नाहीत. पण, आपण मनुष्य आहोत. घटनेने दिलेला अधिकार आहे. आता मी इथला मुखेडचा रहिवासी आहे. माझं आणि माझ्या पत्नीच्या या मतदार यादीत नाव आहे. तुम्ही कधीही ऑनलाईन तपासून घेऊ शकता, असं त्यांनी भर प्रचारसभेत म्हटलं आहे, आता मी इथला मुखेडचा रहिवासी आहे. माझं आणि माझ्या पत्नीच्या या मतदार यादीत नाव आहे. तुम्ही कधीही ऑनलाईन तपासून घेऊ शकता. ज्या ज्या मुखेडचा रहिवाश्याला अधिकार आहे, तो अधिकार मला आहे. त्यांच्या या वक्तव्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


काय म्हणालेत बालाजी खतगावकर? 


कोणत्याही गावात, कोणत्याही जिल्ह्यात तुम्हाला मतदार यादीमध्ये नाव टाकता येतं. कारण आपण भारतीय आहोत. पण, ज्यांनी या घटनेच्या कायद्यान्वे, तुमच्या मतांनी निवडून गेलेले, विधीमंडळाचे सदस्य राहिलेले, त्यांना वाटतं आहे, बालाजी खतगावकर बाहेरचा आहे, म्हणजे त्यांचे डोके ठिकाणावर आहेत का? की त्यांचा मेंदू गुडघ्यामध्ये आहे. ही घटना समजली नाही. म्हणजे किती दुर्दैव आहे. माणसाची औलाद आहे की कुत्र्याची औलाद आहे. कुत्रे गल्लीमध्ये एकमेकांना येऊ देत नाहीत. पण, आपण मनुष्य आहोत. घटनेने दिलेला अधिकार आहे. आता मी इथला मुखेडचा रहिवासी आहे. माझं आणि माझ्या पत्नीच्या या मतदार यादीत नाव आहे. तुम्ही कधीही ऑनलाईन तपासून घेऊ शकता. ज्या-ज्या मुखेडच्या रहिवाश्याला अधिकार आहे, तो अधिकार मला आहे. आता मी बसमध्ये बसलेला आहे, मी बाहेरचा नाही. मुखेडच्या बसमध्ये बसलेला आहे, हे मी तुमच्या माध्यमातून त्यांना अवगत करतो, मी कधी कोणावर टीका करत नाही, बऱ्याच गोष्टी मी लोकांकडून ऐकतो, असंही बालाजी खतगावकर पुढे म्हणालेत.