Maharashtra Vidhan Sabha Election 2024: संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेला विधानसभा निवडणुकीची(Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी आज रंगते आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठीचे आज (बुधवारी) मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडी सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर विरोधी महाआघाडी महाविकास आघाडी (MVA) ला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी मतदान सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. तर संध्याकाळी 6 वाजता ही निवडणुकीची सांगता होत मतदारांचा अंतिम कौल मतपेटीत कैद होणार आहे आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी नंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. 


गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक, तर मुंबईची पिछाडी 


दरम्यान, दुपारी 1 वाजतापर्यंत नागपूर विदर्भासह संपूर्ण राज्यात किती टक्के मतदान झाले ज्याची आकडेवारी समोर आली आहे. यात संपूर्ण राज्याच्या तुलनेत विदर्भात सर्वाधिक मतदान झाल्याचे पुढे आले आहे. राज्यात दुपारी 1 वाजतापर्यंत 32.18 टक्के मतदान झाले असून एकट्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 50.89 टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान हे मुंबई आणि मुंबई शहर येथे झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यात 27.73 % तर  मुंबई उपनगर जिल्ह्यात 30.43% मतदान झाले आहे. त्यामुळे आगामी काळात मतदानाचा टक्का वाढवा यासाठी सर्व स्तरातून आवाहन केलं जात आहे. 


राज्यातील मतदानाची टक्केवारी 



  • मुंबई- 28.12%

  • कोकण- 34.40%

  • पश्चिम महाराष्ट्र- 34.74%

  • उत्तर महाराष्ट्र - 32.12%

  • विदर्भ- 40.11%

  • मराठवाडा- 29.20%


गडचिरोली जिल्ह्याची सरसी, तर मुंबईची पिछाडी 


अहमदनगर -  ३२.९० टक्के,
अकोला - २९.८७ टक्के,
अमरावती - ३१.३२ टक्के, 
औरंगाबाद- ३३.८९ टक्के, 
बीड - ३२.५८ टक्के, 
भंडारा- ३५.०६ टक्के, 
बुलढाणा- ३२.९१ टक्के, 
चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
धुळे - ३४.०५ टक्के, 
गडचिरोली-५०.८९ टक्के, 
गोंदिया - ४०.४६ टक्के, 
हिंगोली -३५.९७ टक्के, 
जळगाव - २७.८८ टक्के, 
जालना- ३६.४२ टक्के, 
कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
लातूर _ ३३.२७ टक्के, 
मुंबई शहर- २७.७३ टक्के, 
मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
नागपूर - ३१.६५ टक्के,
नांदेड - २८.१५ टक्के, 
नंदुरबार- ३७.४० टक्के,
नाशिक - ३२.३० टक्के, 
उस्मानाबाद- ३१.७५ टक्के, 
पालघर-३३.४० टक्के, 
परभणी-३३.१२टक्के,
पुणे - २९.०३ टक्के,
रायगड - ३४.८४  टक्के, 
रत्नागिरी-३८.५२ टक्के,
सांगली - ३३.५० टक्के,
सातारा -३४.७८ टक्के, 
सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के,
सोलापूर - २९.४४,
ठाणे -२८.३५ टक्के, 
वर्धा - ३४.५५ टक्के,
वाशिम - २९.३१ टक्के,
यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी 
अहमदनगर -  ३२.९० टक्के,
अकोला - २९.८७ टक्के,
अमरावती - ३१.३२ टक्के, 
औरंगाबाद- ३३.८९ टक्के, 
बीड - ३२.५८ टक्के, 
भंडारा- ३५.०६ टक्के, 
बुलढाणा- ३२.९१ टक्के, 
चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
धुळे - ३४.०५ टक्के, 
गडचिरोली-५०.८९ टक्के, 
गोंदिया - ४०.४६ टक्के, 
हिंगोली -३५.९७ टक्के, 
जळगाव - २७.८८ टक्के, 
जालना- ३६.४२ टक्के, 
कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
लातूर _ ३३.२७ टक्के, 
मुंबई शहर- २७.७३ टक्के, 
मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
नागपूर - ३१.६५ टक्के,
नांदेड - २८.१५ टक्के, 
नंदुरबार- ३७.४० टक्के,
नाशिक - ३२.३० टक्के, 
उस्मानाबाद- ३१.७५ टक्के, 
पालघर-३३.४० टक्के, 
परभणी-३३.१२टक्के,
पुणे - २९.०३ टक्के,
रायगड - ३४.८४  टक्के, 
रत्नागिरी-३८.५२ टक्के,
सांगली - ३३.५० टक्के,
सातारा -३४.७८ टक्के, 
सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के,
सोलापूर - २९.४४,
ठाणे -२८.३५ टक्के, 
वर्धा - ३४.५५ टक्के,
वाशिम - २९.३१ टक्के,
यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.


हेही वाचा :


Documents For Vidhan Sabha Election 2024 : आज राज्यात विधानसभेसाठी मतदान, 'या'पैकी कोणतेही एक कागदपत्र असले तरी करता येणार मतदान!