Rajya Sabha Election Maharashtra Results Celebration 11 June Live : आपण जिंकल्यानंतर अनेकांच्या तोंडाचं पाणी पळाले - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : राज्यसभेच्या सहापैकी पाच जागांचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात या विजयाचं सेलिब्रेशन सुरु आहे. पाहा प्रत्येक अपडेट्स....

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jun 2022 03:44 PM

पार्श्वभूमी

Rajya Sabha Election 2022 : राज्यात राज्यसभा निवडणुकीचा धुरळा (Rajya Sabha Election 2022 Live Update) उडाल्याचं पाहायला मिळालं.  राज्याचे लक्ष लागून असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपचे तीन खासदार...More

राज्यसभा निवडणुकीत अब्दुल सत्तारांनीच आम्हाला मदत केली - आमदार संतोष दानवे

राज्यसभा निवडणुकीत अब्दुल सत्तारांनीच आम्हाला मदत केली,गद्दारांच्या यादीत अब्दूल सत्तार यांचं नाव पहिलं असायला हवं अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांनी दिलीय. राज्यसभा निवडणुकीत सत्तारांनी भाजपला मदत केल्याचा आमदार संतोष दानवे यांनी दावा केलाय... काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे फुटून महाविकास आघाडी ला मतदान करतील असा दावा केला होता, त्याला  प्रत्युत्तर देताना आमदार संतोष दानवे यांनी हा नवीन दावा केलाय.