Maharashtra Politics, Nashik : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांविरोधात हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले होते. मात्र, आज (दि.4) अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही उमेदवारांनी माघार घेतली आहे. राष्ट्रवादीच्या देवळालीच्या उमेदवार सरोज आहेर यांच्याविरोधात शिंदेंनी राजश्री आहेरराव यांना एबी फॉर्म दिला होता. तर दिंडोरीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात शिंदेंनी धनराज महाले यांनी एबी फॉर्म दिला होता. मात्र, राजश्री आहेरराव आणि धनराज महाले यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
देवळाली विधानसभा मतदारसंघात नवा ट्वीस्ट
राजश्री आहेरराव यांना शिंदे गटाने दिलेले उमेदवारी रद्द करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. माजी खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर निवडणूक आयोगाला देण्यासाठी पत्र घेऊन आले. पक्षाच्या सचिवाचे सहीचे पत्र देणार निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने दिलेले उमेदवार राजश्री आहिराव यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी यासाठीचे पत्र देण्यात आले आहे. उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्याने उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी पक्षाची पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे.
दिंडोरी मतदारसंघात एबी फॉर्म पाठवलेले धनराज महाले नॉट रिचेबल
शिंदेंच्या शिवसेनेचे दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले यांनी अखेर माघार घेतली आहे. मात्र, काल संध्याकाळपासून ते नॉट रीचेबल आहेत. सूचका मार्फत पत्र पाठवून धनराज महाले यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी माघारीचे आदेश दिल्यानंतर काल संध्याकाळपासून धनराज महाले नॉट रीचेबल होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्धा तास अगोदर धनराज महाले यांना विमानातून AB फॉर्म पाठवण्यात आला होता. धनराज महाले यांनी माघार घेतल्यानं अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र धनराज महाले अद्यापही नॉट रीचेबल आहेत.
माजी खासदार हेमंत गोडसे म्हणाले, राजश्री आहेरराव यांचा आज उमेदवारी रद्द करण्याचा पक्षाने आदेश या ठिकाणी दिलेला आहे. त्यांना या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही म्हणून पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कळवलेले आहे. ते आज या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत. म्हणून पक्षाने जे काही पत्र या ठिकाणी काढलं तरी ग्राह्य धरून त्यांची माघार या ठिकाणी समजली जावी.
स्वतः उपस्थित राहावे लागते. परंतु आता महायुतीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाने तसं निवडणूक अधिकाऱ्यांना ठिकाणी कळवलेलं आहे. अनेक ठिकाणी राज्यांमध्ये अनेक ठिकाणी एबी फॉर्म प्रत्येक पक्षाचे दिले गेले होते. राष्ट्रवादी असेल त्यांनी कुठेही फॉर्म भरायचे या उद्देशाने त्या ठिकाणी फॉर्म भरला गेला होता. आपण सर्व ज्या ठिकाणी एबी फॉर्म भरलेले असतील असे सर्वच उमेदवारांना माघारी घेण्याचं आदेश दिले, असंही हेमंत गोडसे म्हणाले.
हेलिकॉप्टर मधून एबी फॉर्म आले किंवा आणि त्याचीच आतापर्यंत चौकशी तसं काही स्पष्ट त्याठिकाणी झालेलं नाही. समजा एखाद्या उमेदवार आता माघार घेणार असतील किंवा नसतील जे काही नियमाप्रमाणे जी काही खर्च निवडणूक आयोगाकडे आपल्याला द्यावा लागतो. पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आदेशित केलेले का हे ग्राह्य धरल्या जाऊ नये. आम्ही उद्या देखील पक्षप्रमुख शिंदे साहेब आम्हाला आदेशित करतील आणि आम्ही महायुतीच्या प्रचारामध्ये त्या ठिकाणी सहभागी आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या