Maharashtra Politics : राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं. आणि त्यातही भाजपनं एकशे बत्तीस जागा जिंकून सत्तेची सूत्रं ही आपल्या हाती राहतील याची खबरदारी घेतली. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी महाविकास आघाडीचा सूर काहीसा पालटू लागल्याची चिन्हं आहेत. आणि त्याचं पहिलं प्रतिबिंब हे ठाकरेंच्या शिवसेनेत उमटल्याचं दिसून आलं. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या बैठकीत स्वबळाचा सूर उमटला. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्याची कबुली दिली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीचं काल उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आयोजन करण्यात आलं होतं. 


मविआमधून निवडणूक लढवून फारसा फायदा नाही?


महायुतीच्या त्सुनामीत मविआची दाणादाण उडाली...त्यानंतर आता मविआतल्या तिन्ही पक्षांत पराभवाववर चिंतन सुरू झालंय...मातोश्रीवरही ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आणि पराभूत उमेदवारांची बैठक झाली. त्यात अनेक जणांकडून स्वबळाच्या नाऱ्याचा सूर उमटला...मविआमधून निवडणूक लढवून फारसा फायदा नाही, अशी ठाकरे गटाची धारणा बनतेय...उबाठा शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यावर मित्र पक्ष काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीतून उत्तर दिलं गेलं. हा मविआचा अंतर्गत प्रश्न आहे, असं सांगत सुधीर मुनगंटीवारांनी ठाकरेंबाबत एक भाकीतही व्यक्त केलंय....


पुनरावृत्ती आगामी महापालिका निवडणुकांत होऊ नये


लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या व्होटबँकेचा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेलाही झाला होती...लोकसभेत ठाकरे गटाला जे यश मिळालं त्यात मुस्लिम समाजाचा वाटा होता असं विश्लेषण केलं गेलं...पण विधानसभेत याच गोष्टीचा फटका ठाकरेंना बसल्याचं बोललं जातंय...महाविकास आघाडी सोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरेंचा मराठी आणि हिंदू मतदार काही प्रमाणात दूर गेलाय...त्यामुळे विधानसभेत पानिपत झालं...आता त्याची पुनरावृत्ती आगामी महापालिका निवडणुकांत होऊ नये, यासाठी ठाकरे गटाकडून खबरदारी घेतली जातेय...त्यातूनच ठाकरे गटात स्वबळाचा विचार होऊ शकतो...


अंबादास दानवे काय म्हणाले?


काही लोकांचा सुर आहे की आपण स्वतंत्र लढल पाहिजे. एक दोन नाही तर अनेकांनी मत व्यक्त केल कि शिवसेनेने स्वतंत्र गेलं पाहिजे.  शिवसेनेला सत्ता हवीय असं नाही. मात्र कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी कोणाचीही गरज नाही एवढं त्यांच्या एका पक्षाला यश मिळाला आहे थोड्या बहुत उरलेल्या लोकांची ते तजवीज करू शकतात. तर महायुतीत . महायुतीत शिंदे कितीही नाराज असले तरी त्यांना भाजप समोर झुकावं लागेल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?