Nagarparishad Election 2025 : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह अनेक जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. थंडीच्या कडाक्यातही मतदारराजा मतदानासाठी बाहेर पडला असल्याचे चित्र आहे. तर काही मतदान केंद्रावर संथ गतीने मतदारांनी हजेरी लावली आहे. दरम्यान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. असे असताना राज्यातील काही मतदानकेंद्रावर निवडणूक प्रक्रियेचा पुन्हा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळालंय. यात अकोल्याच्या बाळापुरात प्रभाग 5 मधील बूथ क्रमांक एकवर EVM मशीन बंद पडलीय. तर तिकडे यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असून एका केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला आहे. सोबतच फलटण नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचे बटन दबत नसल्यामुळे गोंधळ उडाल्याचे बघायला मिळालं.

Continues below advertisement

Akola News : EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; ऐनवेळी बदलण्यात आली मशीन

अकोल्याच्या बाळापुरात प्रभाग 5 मधील बूथ क्रमांक एकवर EVM मशीन बंद पडलीय. जवळपास 20 मिनिट मतदान प्रक्रिया ठप्प पडली होती. दरम्यान, ऐनवेळी नगरपालिकेच्या आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून EVM मशीन दुसरी बदलण्यात आली आहे. मशीनच्या सॉकेट तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर ईव्हीएम मशीन रिप्लेस अर्थातच दुसरी बसवण्यात आली. बाळापूरातील कासारखेड जुनी इमारत दक्षिण भागातील नगरपरिषद प्राथमिक मराठी शाळा मतदान केंद्रावरील हा प्रकार आहे. दरम्यान, बंद पडलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये 12 जणांचं मतदान झालं होतं.

Continues below advertisement

Yavatmal : यवतमाळमध्ये 20 मिनिटांपासून मतदान बंद, मतदारांची मोठी रांग

असाच काहीसा प्रकार यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना झालाय. यात एका केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला आहे. प्रभाग क्रमांक 27 मधील ध्रुव प्राथमिक शाळा या मतदान केंद्रावरील खोली क्रमांक पाच मधील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 20 मिनिटांपासून मतदान बंद आहे. त्यामुळे मतदारांची मोठी रांग या ठिकाणी लागली आहे.

दरम्यान, फलटण नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचे बटन दबत नसल्यामुळे गोंधळ उडालाय. परिणामी, प्रभाग क्रमांक 13 मधील चार नंबरच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया थांबवली. या प्रकरणानंतर समशेर सिंह नाईक निंबाळकर स्वतः मतदान केंद्रावर उपस्थित राहून त्यांनी माहिती घेतलीय.

Phulambri : मतदान केंद्राबाहेर जादूटोणा केल्याच्या प्रकार

दुसरीकडे, पैठणनंतर आता ऐन मतदानाच्या एक दिवस आधीच फुलंब्री शहरात मतदान केंद्रा बाहेर जादूटोणा केल्याच्या प्रकार समोर आला. भारत माता शाळा मतदान केंद्रावर बाहेर हा प्रकार समोर आला आहे. एक काळी बाहुली त्याला पिना टोचलेल्या, लिंबू आणि इतर साहित्य दिसून आलं. त्यामुळे काही मतदानाच्या आतल्या रात्री सगळ्या प्रकार समोर आल्याने फुलंब्री चर्चा रंगली होती. तर हा सगळा प्रकार कोणी केला याबाबत स्पष्टता मिळू शकली नाहीये.

आणखी वाचा