Ambernath Nagarparishad Election 2025: राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून राज्यातीलअनेकमतदानकेंद्रावरसकाळपासूनचमतदारांनीरांगालावल्याचेपाहायलामिळतआहे. अशातच अंबरनाथच्या (Ambernath Nagarparishad Election 2025) कोहोजगाव परिसरातुनएकखळबळउडवणारीबातमीसमोरआलीआहे. मतदानासाठी शेकडो महिलांची एका सभागृहात गर्दी जमलीअसूनहे मतदार बोगस (Bogus Voters in Ambernath) असल्याचा राजकीय पक्षांनी आरोप केलाय. या प्रकरणानंतर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झालेअसूनइथलं वातावरण आता तापलं आहे.
Ambernath Nagarparishad Election 2025: काँग्रेस व भाजप कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले, वातावरण तापलं
अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात एका सभागृहात मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास महिला आणि पुरुष जमले होते. हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याचा आरोप काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय. दरम्यान काँग्रेस व भाजप कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इथे गोंधळ घातला, या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवाराने आणल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय. या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या सभागृहातील महिलांना बाहेर काढले. या महिला कुठून आल्या आणि खरंच या बोगस मतदान करण्यासाठी आल्या होत्या का? याची चौकशी आता केली जाते आहे. मात्र या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण तापलं आहे.
Ambernath Police : एकूण 208 महिला आणि मुलं, हेलोक स्थानिक नाहीत
दरम्यानयाप्रकरणीपोलिसांनीमाहितीदेतानासांगितलंकि, अशी तक्रार आल्यानंतर खात्री-पडताळणी सुरू आहे. मोठ्याप्रमाणात जमलेल्या महिलाआणि त्यांचं तिथे असण्याचं कारण शोधणे सुरू आहे. मात्रहेलोक स्थानिक नाहीत. एकूण 208 महिला आणि मुलं यामध्ये आहेत. सगळेच भिवंडीवरून आले असल्याचीमाहितीआहे. फिरती पथकाकडून तपास सुरू आहे. लवकरचयाप्रकरणाचीमाहितीसमोरयेईलअशीमाहितीअंबरनाथपोलिसांनीदिलीआहे.
Bogus Voters in Ambernath : मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दोन जणांना पकडलं
अंबरनाथ नगरपालिकेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये दोन जणांना पैशाची पॉकिट वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलंय. त्यानंतर या दोन जणांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिलंय. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
आणखी वाचा
