मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणं मनसेनं आज 18 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांच्या मान्यतेनं मनसेनं उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. मनसेनं 18 उमेदवारांच्या यादीसह आतापर्यंत एकूण 135 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
मनसेच्या सातव्या यादीत कुणाला संधी ?
बाळापूर - मंगेश गाडगे
मूर्तिजापूर-भिकाजी अवचर
वाशिम- गजानन वैरागडे
हिंगणघाट- सतीश चौधरी
उमरखेड - राजेंद्र नजरधने
औरंगाबाद मध्य- सुहास दाशरथे
नांदगाव- अकबर सोनावाला
इगतपुरी - काशिनाथ मेंगाळ
डहाणू- विजय वाढिया
बोईसर- शैलेश भुतकडे
भिवंडी पूर्व- मनोज गुळवी
कर्जत खालापूर- जगन्नाथ पाटील
उरण- सत्यवान भगत
इंदापूर- अमोल देवकाते
पुरंदार - उमेश जगताप
श्रीरामपूर- राजू कापसे
पारनेर- अविनाश पवार
खानापूर - राजेश जाधव
इगतपुरीत हिरामण खोसकर यांच्या विरुद्ध काशिनाथ मेंगाळ यांना उमेदवारी
नाशिकच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघात मनसेकडून शिंदेंच्या शिवसेनेतून प्रवेश केलेल्या माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. मनसेच्या काशिनाथ मेंगाळ यांच्यामुळे युतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्या समोरील आव्हान वाढणार आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून हिरामण खोसकर आणि महाविकास आघाडी कडून लकी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेने माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना उमेदवारी दिल्यामुळे इगतपुरी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. मनसेकडून आयारामांना संधी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातही भाजपमधून आलेल्या दिनकर पाटलांना उमेदवारी तर इगतपुरीत शिंदे गटातून मनसेत आलेल्या काशिनाथ मेंगाळांना संधी देण्यात आली आहे.
इंदापूरमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होत आहे. अजित पवारांकडून दत्तात्रय भरणे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटील रिंगणात आहेत. इथं मनसेकडून अमोल देवकाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पारनेर विधानसभा मतदार संघात खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी मनसेनं अविनाश पवार यांना उमेदवारी दिली आहे.
अमित ठाकरे यांच्याकडून अर्ज दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, वरळी विधानसभा मतदारसंघातून देखील संदीप देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
इतर बातम्या :