Sudhir Mungantiwar : मध्यप्रदेश आणि हरियाणा चा अनुभव पाहता एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) महायुतीला (Mahayuti) जितक्या जागा दाखवल्या आहेत त्यापेक्षा जास्तच जागा मिळतील असा विश्वास भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांनी अर्थशास्त्रापेक्षा मनशास्त्राचा जो विचार केला त्याचं कौतुक केलं पाहिजे. यावेळी महायुतीच्या बाजूने मोठा करंट असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
मतदानात झालेली वाढीचा फायदा भाजपलाच होणार
महायुतीला निश्चितच बहुमत मिळेल आणि बहुमतानंतर देखील अनेक पक्ष आणि अपक्ष आमच्यासोबत येऊ शकतात आणि आम्ही त्यांचा स्वीकार करु असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. अमित शाह यांनी मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं कधीच म्हटलं नाही, मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल असे ते म्हणाले होते. महिला मतदारांचा वाढलेला टक्का आणि एकूण मतदानात झालेली वाढ याचा फायदा आम्हालाच होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
लाडक्या बहिणींनी आम्हाला मोठा आशिर्वाद दिला
सरकार आम्ही बनवू असेच अनेक एक्झिट पोलमध्ये सांगितलं आहे. लाडकी बहिण योजनचा आम्हाला मोठा फायदा झाला. लाडक्या बहिणींनी आम्हाला मोठा आशिर्वाद दिल्याचे मुनगंटीवार म्हणाले. लोकसभेच्या पराभवाची मानसिकता, तणाव होता, पण यातून आम्ही बाहेर पडलो आहोत. यावेळी लोकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. महायुतीला बहुमत प्राप्त होईल. विकासासाठी अनेक अपक्ष उमेदवार देखील आम्हाला पाठिंबा देतील असे मुनगंटीवार म्हणाले.
एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? (Exit Poll)
महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडले. निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राबाबत 10 एक्झिट पोल आले आहेत. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती पुन्हा एकदा पुनरागमन करताना दिसत आहे. MATRIZE च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 150 ते 170 जागा, MVA ला 110 ते 130 जागा मिळताना दिसत आहेत. याशिवाय चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या सर्वेक्षणात महायुतीला 152-160 जागा आणि एमव्हीएला 130-138 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोल डायरीने महायुती 122-186 जागा आणि MVA 69-121 जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि PMARQ ने महायुती 137-157 आणि MV 126-146 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे. अशा प्रकारे जनमत चाचणीत महायुतीला 150 आणि एमपीएला 126 जागा मिळू शकतात.
महत्वाच्या बातम्या: