मुंबई: महापालिकेच्या मतदानानंतर मुंबईसह राज्यातील एक्झिट पोल समोर आले आहेत. रुद्र रिसर्च अँड अॅनालिटिक्सने राज्यातील सर्व म्हणजे 29 महापालिकांच्या एक्झिट पोलची आकडेवारी मांडली आहे. त्यानुसार महायुती बाजी मारणार असं चित्र आहे. तर केवळ लातूर आणि कोल्हापूरमध्येच काँग्रेसला जिंकण्याची संधी असल्याचं वर्तवण्यात आली आहे. 

Continues below advertisement

Mumbai Exit Poll : मुंबईतील एक्झिट पोल

जनमत, डीव्ही रिसर्च, अॅक्सिस माय इंडिया, जे व्ही सी आणि प्राब या पाच पोलनुसार मुंबईत भाजप आणि शिवसेनेनं बाजी मारलीय. जनमत आणि जेव्हीसीच्या पोलनुसार मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार भाजप, शिवसेनेला 107 ते 122 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

अॅक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार युतीला मुंबईत 131 ते 152 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर जनमतच्या पोलनुसार ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 62 जागांचा अंदाज आहे. डीव्ही रिसर्च नुसार ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला 68  ते 83 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर प्राबच्या अंदाजानुसार ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला 52 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

Continues below advertisement

Sr.No. महापालिका भाजप शिवसेना शिंदे राष्ट्रवादी (AP)   काँग्रेस शिवसेना ठाकरे

राष्ट्रवादी (SP)

मनसे इतर
1 मुंबई 80-90 35-40 2-3 22-27 60-70 0-1 7-12 8-12
2 पुणे 90-100 8-12 30-40 10-15 2-3 3-5 2-3 5-10
3 नागपूर 80-90 2-3 1-2 45-55 2-3 1-2 0-1 8-10
4 पिंपरी चिंचवड 70-85 4-8 35-50 0-0 1-3 1-2 1-2 0-2
5 ठाणे 25-30 50-55 5-8 1-2 8-12 12-15 2-4 5-7
6 नाशिक 55-65 32-35 5-6 5-6 16-20 0-0 2-3 2-4
7 कल्याण डोंबिवली 45-50 50-55 0-1 1-2 10-15 0-1 4-6 2-5
8 छ. संभाजीनगर 20-25 30-35 1-2 4-5 12-18 0-1 0-1 35-40
9 वसई विरार 40-50 2-3 1-2 5-6 4-5 0-0 0-1 45-55
10 सोलापूर 55-65 8-12 8-10 8-12 1-2 1-2 0-0 10-15
11 नवी मुंबई 58-62 44-48 0-1 0-0 2-3 0-1 0-1 0-1
12 मिरा भाईंदर 50-55 25-30 2-3 8-10 5-7 1-2 0-1 3-4
13 अमरावती 30-35 3-4 20-25 10-15 1-2 00-00 0-0 12-17
14 पनवेल 50-55 1-2 0-1 4-8 7-10 2-5 0-1 15-20
15 भिवंडी 18-22 10-15 0-0 25-30 1-2 3-5 0-0 30-35
16 नांदेड 35-40 10-15 2-5 12-17 0-0 0-0 0-0 12-17
17 अकोला 45-50 1-2 3-4 10-15 3-5 0-0 0-0 8-12
18 मालेगाव 5-10 10-15 0-0 5-10 0-0 0-1 0-0 55-65
19 कोल्हापूर 20-25 15-20 5-10 28-32 1-2 0-0 0-0 3-5
20 सांगली 35-40 1-2 15-20 14-18 0-0 7-10 0-0 0-2
21 जळगाव 35-40 12-17 1-2 0-0 5-10 0-1 0-0 2-3
22 धुळे 45-50 5-10 4-8 3-5 3-5 1-2 0-0 5-10
23 उल्हासनगर 28-32 35-40 4-8 1-2 2-4 0-0 0-1 4-8
24 लातूर 25-29 0-0 4-7 28-33 0-1 1-2 0-0 3-5
25 अहिल्यानगर 19-24 8-12 20-25 1-3 2-5 2-4 0-0 3-6
26 चंद्रपूर 22-27 1-3 3-5 22-27 3-5 0-1 0-0 8-12
27 परभणी 8-12 3-5 15-20 8-12 10-15 1-2 0-0 5-10
28 इचलकरंजी 30-40 3-5 1-2 0-0 0-1 0-0 0-0 20-30
29 जालना 28-33 20-25 1-2 8-12 1-2 0-2 0-0 3-5

ही बातमी वाचा: