मुंबई : महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर आता सर्वाचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. परंतु त्या आधी मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल (BMC Exit Poll) समोर आला आहे. 227 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये मनसेला फक्त 6 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला 54 जागा मिळण्याचा अंदाज आहे. ज्युबिलिएंट डेटा स्टुडिओ एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, मुंबईत 127 ते 155 जागा घेत भाजप सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Continues below advertisement

जेडीएस एक्झिट पोलच्या (JDS Exit Poll) अंदाजानुसार, मुंबईत भाजप-शिंदेंच्या युतीला 127 ते 154 जागा मिळतील. तर ठाकरे बंधूंच्या युतीला 44 ते 64 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

BMC Exit Poll : ठाकरेंना 58 तर मनसेला 6 जागांचा अंदाज

जेडीएस एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसनेला 44 ते 58 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर राज ठाकरेंच्या मनसेला फक्त 6 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाकरेंच्या सेनेने 163 जागा लढवल्या होत्या, तर मनसेने 53 जागा लढल्या होत्या. त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही असंही म्हटलं आहे.

Continues below advertisement

JDS Exit Poll : शिंदेच्या शिवसेनेला 54 जागा

या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे 87 ते 101 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी 92 जागा लढवलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला 54 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Mumbai Election Exit Poll : काँग्रेसला 25 जागा 

या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, 150 जागा लढवलेल्या काँग्रेसला फक्त 16 ते 25 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 45 जागा लढवलेल्या वंचितला भोपळाही फोडता येणार नाही असं म्हटलं आहे. 

Mumbai Election Result : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा? 

जेडीएस एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 ते 4 जागा मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 93 जागा लढवल्या होत्या. तर समाजवादी पक्षाला 2 ते 3 आणि एमआयएमला 2 ते 5 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Arun Gawli Party Seats : अरूण गवळींच्या पक्षाला दोन जागा

महापालिकेच्या दोन जागा लढवणाऱ्या अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेनेला दोन्ही जागांवर यश मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इतर अपक्षांना 5 ते 9 ठिकाणी यश मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

ही बातमी वाचा: