Maharashtra Lok Sabha Election Result 2024 मुंबई: ईशान्य मुंबई (Mumbai North East Lok Sabha) मतदारसंघात ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी विजय मिळवला आहे. संजय दिना पाटील यांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांचा पराभव केला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेचा यांच्यात चुरस रंगली होती. त्यानंतर संजय दीना पाटील यांनी आघाडी घेत मिहीर कोटेचा यांचा पराभव केला. मिहीर कोटेचा यांना एकूण 4 लाख 21 हजार 076 मत मिळाली, तर संजय दिना पाटील यांना एकूण 4 लाख 50 हजार 937 मत मिळाली. संजय दिना पाटील यांना अबू आझमी यांच्या मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून मोठं लीड मिळालं. तसेच राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मिहीर कोटेचा यांना हवा, तसा प्रतिसाद मिळाला नाही. 

ईशान्य मुंबई लोकसभा विधानसभानिहाय मतदान-

  1. मुलुंड विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या मिहीर कोटेचा यांना 1 लाख 16 हजार 421 मत मिळाली. तर महाविकास आघाडीच्या संजय दिना पाटील यांना 55 हजार 979 मत मिळाली. 
  2. विक्रोळी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या मिहीर कोटेचा यांना 52 हजार 807 मत मिळाली. तर  महाविकास आघाडीच्या संजय दिना पाटील यांना 68 हजार 672 मत मिळाली. 
  3. भांडूप विधानसभा मतदारसंघातून मिहीर कोटेचा यांना 75 हजार 659 मत मिळाली. तर संजय दिना पाटील यांना 79 हजार 117 मत मिळाली. 
  4. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात 63 हजार 3370 मत, तर संजय दिना पाटील यांना 79 हजार 142 मत मिळाली. 
  5. घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात 83 हजार 231 मत, तर 49 हजार 622 मत मिळाली. 
  6. मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून 28 हजार 101 मत, तर संजय दिना पाटील यांना 1 लाख 16 हजार 072 मत मिळाली. या मतदारसंघातून संजय दिना पाटील यांना 87 हजार 971 चा लीड मिळाला.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केल्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा (Mumbai North East Lok Sabha) मतदारसंघातील मतदानाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन यांतील काही तांत्रिक अडचणी वगळता या ठिकाणी शांततेत मतदान झाले. या भागात 94 हजार 378 पुरुष, तर 85 हजार 357 महिलांनी मतदान केले. ईशान्य मुंबईत एकूण 16 लाख 36 हजार 890 मतदार आहेत. त्यापैकी फक्त 9 लाख 22 हजार 760 मतदारांनी मतदान करण्यास उत्साह दाखवला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभेच्या अंतर्गत असलेल्या तीन मतदारसंघात भाजप आणि दोन मतदारसंघात शिवसेना आणि एका मतदारसंघात समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी झाला होता. 

ईशान्य मुंबई लोकसभा निकाल 2024 (Mumbai North East Lok Sabha Result 2024)

                                  उमेदवाराचे नाव                                                 पक्ष                                          कोण विजयी?
संजय दीना पाटील                                             ठाकरे गट                                              विजयी
मिहीर कोटेचा                                               भाजप                                              पराभूत

गेल्या पाच निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचा खासदार 

1999 - किरीट सोमय्या, भाजप
2004 - गुरूदास कामत, काँग्रेस
2009 - संजय पाटील, राष्ट्रवादी
2014 - किरीट सोमय्या, भाजप
2019 - मनोज कोटक, भाजप

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? (Mumbai North East Lok Sabha Voting Percentage 2024)

मुलुंड विधानसभा- 61.33
विक्रोळी विधानसभा- 54.45
भांडुप विधानसभा- 58.53
घाटकोपर पश्चिम विधानसभा- 55.09
घाटकोपर पूर्व विधानसभा- 57.85
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा- 50.48

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

मुलुंड विधानसभा मतदारसंघ- मिहीर कोटेचा, भाजप
विक्रोळी विधानसभा मतदारसंघ- सुनील राऊत, ठाकरे गट
भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ- रमेश कोरगावकर, शिंदे गट
घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ- राम कदम, भाजप
घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ- पराग शहा, भाजप
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ- अबू आझमी, समाजवादी पक्ष

2019 मधील लोकसभेचा निकाल काय होता? (Mumbai North East Lok Sabha Constituency Result 2019)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यावेळच्या भाजप शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक हे 2 लाख 26 हजार 486 मतांनी विजयी झालेले. कोटक यांना 5 लाख 14 हजार 599 मते मिळाली. तर, राष्ट्रवादीचे संजय दीना पाटील यांना दोन लाख 88 हजार 113 मते मिळाली होती. तर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निहारिका खोंडलाय यांना 68 हजार 539 मते मिळाली होती. 

मतदारसंघाचे स्वरुप, प्रश्न काय?

हा मतदारसंघ वर्गीय दृष्ट्या संमिश्र आहे. या मतदारसंघात श्रीमंतांचाही समावेश होतो, तर दुसऱ्या बाजूला हातावर पोट असणाऱ्या गरीब कष्टकरी वर्गाचाही समावेश या मतदारसंघात आहे.या मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्याने मतदारसंघातील प्रश्नही वेगवेगळे आहेत. वाढत्या शहरीकरणाचा परिणाम या ठिकाणी होत आहे. नव्या इमारतींचे बांधकाम, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधा, झोपडपट्टीवासियांचे प्रश्न, एसआरए प्रकल्प, डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा, आरोग्य, आदी विविध पातळीवर विधानसभानिहाय प्रश्न या मतदारसंघात आहेत. धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अनेकांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्याबाबतची चर्चा सुरू आहे. त्याला मुलुंडकरांनी विरोध दर्शवला आहे. हा मुद्दाही निवडणूक येण्याची चर्चा आहे.