मुंबई : शेअर बाजारातील (Share Market) या आठवड्याचा हा पहिला दिवस आहे. एक्झिट पोलचा (Exit Polls) अंदाज समोर आल्यानंतर आता सोमवारी (3 जून) नेमकं काय घडणार? असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान, निवडणुकीची मतमोजणी अवघ्या एका दिवसावर आल्यामुळे आज शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात आज मोठे चढ-उतार होऊ शकतात. याच कारणामुळे गुंतवणूकदारांना आज चांगले पैसे कमवण्याची संधी आहे. दरम्यान, या आठवड्यात शेअर बाजारात एकूण तीन आयपीओ येत आहेत. यातील एक आयपीओ हा मेनबोर्ड आयपीओ तर दोन आयपीओ एसएमई क्षेत्रातील आहेत. यासह तीन आयपीओ असे आहेत, जे 3 आणि 4 जून रोजी बंद होणार आहेत. हे आयपीओ 30 आणि 31 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुले झाले आहेत.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार सध्या शेअर बजार आणि आयपीओ हे चांगलेच तेजीत आहेत. सध्या शेअर बाजारात अस्थिरता असली तर काही आयपीओ मात्र मार्केटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. यामध्ये औफिस स्पेस सोल्यूशन्सच्या आयपीओचा समावेश आहे. याच कारणामुळे सध्या आगामी काळात येणाऱ्या आयपीओंबाबतही गुंतवणूकदार उत्सुक आहेत.
आगामी आठवड्यात कोणकोणते आयपीओ येणार
क्रोनॉक्स लॅऐब सायंसेज आईपीओ : येत्या 3 जून रोजी हा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी खुलाह होणार आहे. 5 जूनपर्यंत गुंतवणूकदारांना या आयपीओत गुंतवणूक करता येईल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 0.96 कोटी शेअर्स विकणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 129 ते 136 रुपये प्रति शेअर असणार आहे.
मॅजेंटा लाइफकेअर आईपीओ : येत्या पाच जूनपासून या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सात जूनपर्यं तुम्हाला या आयपीओत पैसे गुंतवता येणार आहेत. या आयपीओचा किंमत पट्टा 35 रुपये प्रति शेअर आहे.
सॉट्रिक्स आईपीओ : येत्या 5 जून रोजी हा आयपीओ खुला होणार असून 7 जूनपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ एसएमई सेगमेन्टमधील आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी एकूण 18 लाख शेअर्स इश्यू करणार आहे. एसएमई सेगमेंटमधील हा आयपीओ 121 रुपये प्रति शेअर आहे.
असोसिएटेड कोटर्स आईपीओ : हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 30 मे रोजी खुला झालेला असून 3 जूनपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. 5.11 कोटींच्या या आयपीओच्या माध्यमातून 4.22 लाख शेअर्स विकले जाणार आहेत. या आयपीओचा किंमत पट्टा 121 रुपये आहे.
अॅमट्रॉन इलेक्ट्रॉनिक्स आईपीओ : हा आयपीओ 30 मे रोजी खुला झालेला असून 3 जून रोजी तो बंद होणार आहे. एसएमई सेगमेंटमधील हा आयपीओ 87.02 कोटी रुपयांचा असून 54.05 लाख फ्रेश शेअर्स विकले जाणार आहेत. या आयपीओचा किंमत पट्टा 153 ते 161 रुपए प्रति शेअर आहे.
टीबीआय कॉर्न आईपीओ : हा आयपीओ 31 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. चार जून रोजीपर्यंत यात गुंतवणूक करता येईल. या आयपीओची साईझ 44.94 कोटी रुपये असून या माध्यमातून कंपनी 47.81 लाख शेअर्स विकणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 90 ते 94 रुपए प्रति शेअर ठेवण्यात आलाय.
हेही वाचा :
जून महिन्यात बदललेले 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड!
Bank Holiday : जून महिन्यात तब्बल 'इतके' दिवस बँका बंद; जाणून घ्या नेमकी तारीख!