Maharashtra Gram Panchayat Election 2022: राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.  राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या,  तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135  ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30  ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी 20 डिसेंबर 2022 रोजी  मतमोजणी होईल. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. यामध्ये तरुणांसह वृद्धांनीही पुढे येऊन मोठ्या प्राणात मतदान केलं. यातच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कोणत्या जिल्ह्यात किती मतदान झालं हे जाणून घेऊ...


Raigad Gram Panchayat Election  :  रायगड जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत सुमारे 70.82 टक्के मतदान
 
रायगड जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत सुमारे 70.82 टक्के मतदान झाले आहे. उरण येथे सर्वाधिक 77.81 टक्के मतदान झाले.  म्हसळा येथे 59.08 टक्के मतदान झाले.


Gram Panchayat Election  : धुळे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक, दुपारी 3.30 वाजेपर्यंत 65.90 % मतदान


धुळे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक, दुपारी 3.30 वाजेपर्यंत 65.90 टक्के मतदान झाले आहे.


Akola Gram Panchayat Election : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.60 टक्के मतदान


जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.60 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात 266 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले आहे.


Sindhudurg Gram Panchayat Election : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 59.08 टक्के मतदान


सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 59.08 टक्के मतदान झालं आहे.


Bhandara Gram Panchayat Election : भंडाऱ्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 64.62 टक्के मतदान
 
भंडारा जिल्ह्यातील 303 ग्रामपंचायतची निवडणूक पूर्णपणे शांततेत पार पडली. 1049 मतदान केंद्रावर ही निवडणूक पार पडली. दुपारी 3.30 वाजेपर्यंत 64.62 टक्के मतदान झाले आहे. 


Wardha Gram Panchayat Election : वर्धा जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 66.17%मतदान झालंय




वर्धा जिल्ह्यातील 113 ग्रामपंचायत निवडणूकांसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 66.17 टक्के मतदान झालं.



Gram Panchayat Election : जळगाव जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजतापर्यंत मतदान टक्केवारी 68.58 



जळगाव जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजतापर्यंत मतदान टक्केवारी 68.58 इतकी आहे. 



Gram Panchayat Election : यवतमाळ  जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.45 टक्के मतदान



जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.45 टक्के मतदान झालं आहे. जिल्ह्यात 93 ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं.



Gram Panchayat Election : दुपारी  3:30 वाजेपर्यंत अहमदनगर ग्रामपंचायत मतदान टक्केवारी



अहमदनगर ग्रामपंचायत मतदान टक्केवारी : अहमदनगर जिल्ह्यात 190 ग्रामपंचायतीसाठी दुपारी  3:30 वाजेपर्यंत 69.42 टक्के मतदान झालं आहे.


प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या


ठाणे - 35, पालघर - 62, रायगड - 191, रत्नागिरी - 163, सिंधुदुर्ग - 291, नाशिक - 188, धुळे - 118, जळगाव - 122, अहमदनगर - 195, नंदुरबार - 117, पुणे - 176, सोलापूर - 169, सातारा - 259, सांगली - 416, कोल्हापूर - 429, औरंगाबाद - 208, बीड - 671, नांदेड - 160, उस्मानाबाद- 165, परभणी - 119, जालना - 254, लातूर - 338, हिंगोली - 61, अमरावती - 252, अकोला - 265, यवतमाळ - 93, बुलडाणा - 261, वाशीम - 280, नागपूर - 234, वर्धा - 111, चंद्रपूर - 58, भंडारा - 304, गोंदिया - 345, गडचिरोली- 25. एकूण - 7,135.   


संबंधित बातमी: 


Maharashtra Gram Panchayat Election 2022 : नवरी मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर, 104 वर्षांच्या आजोबांनीही बजावला हक्क; गावगाड्यात मतदानाचा उत्साह