मुंबई: राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी (Maharashtra Gram Panchayat Election) आज मतदान पार पडलं असून प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी 74 टक्के मतदान झाले. यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी आज मतदान (Voting) झालं. 


राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 1 हजार 79 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30  ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 64.83 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी उद्या (ता. 17 ऑक्टोबर) मतमोजणी होईल.


भंडारा जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 61.39 टक्के मतदान झालं होतं. तर नंदुरबारमध्ये 60. 09 टक्के मतदान झालं आहे. तर रायगडमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 65 टक्के मतदान झालं होतं. 


पालघरमध्ये राडा  


पालघरमधील उमरोली ग्रामपंचायत मतदान केंद्रावर मतदानाच्या दरम्यान दोन गटात राडा झाला आहे. मतदानासाठी आलेल्या लोकांवरुन दोन गटात वाद झाल्याचं कळतय. दरम्यान पोलिसांच्या मध्यतस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या वादामुळे उमरोळी मतदान केंद्राबाहेर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.


अकोल्यात वंचितची मुसंडी 


अकोला जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती-उपसभापतीपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील सातपैकी तब्बल सहा पंचायत समित्यांवर भारिप-बहुजन महासंघानं सत्ता स्थापन केली आहे.


अकोट आणि बार्शीटाकळीमध्ये भाजपनं महाविकास आघाडीला साथ दिली आहे. अकोटमध्ये भाजपच्या साथीनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सभापती झालाय. तर बार्शीटाकळीत शिवसेनेच्या बंडखोर सुनंदा मानतकार यांनी भाजपात प्रवेश करीत सभापतीपद पटकावलं आहे. येथे सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनंही भाजपला मतदान केलंय. तर मुर्तिजापूरात महाविकास आघाडीत बिघाडी होत उद्धव ठाकरेंच्या सेनेने वंचितला पाठिंबा दिलाय. 


राज्यात आज ग्रामपंचायतीसंह सरपंचपदासाठी थेट निवडणूक होत आहे. आज सकाळी सात वाजता मदतानाला सुरुवात झाली तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदान पार पडलं. नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. 


जिल्हा व तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या 



ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79.


पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70 ( पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 711 सदस्य बिनविरोध तर १० सरपंच बिनविरोध आलेत, तर जिल्ह्यात पाच ग्रामपंचायती बिनविरोध आहेत ) 


रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1.


रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10.


सिंदुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवडगड- 2. नाशिक:
इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71.


नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81.


पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1.


सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6.


कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1.


अमरावती: चिखलदरा- 1.


वाशीम: वाशीम- 1.


नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8.


वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7.


चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1.


भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1.


गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2.


गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1