Maharashtra Exit Polls 2019 : मुंबई : महाराष्ट्रात युतीला 42च्या वरच जागा मिळतील, 41 होणार नाहीत. तसंच देशात भाजप 300 जागांचा आकडा पार करुन पुन्हा बहुमत मिळवेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर विविध वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये एनडीए पुन्हा सत्तेच्या जवळ जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यावर रावसाहेब दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Exit Poll | महाराष्ट्रात युतीला 42 च्या वरच जागा मिळतील, रावसाहेब दानवेंना विश्वास



जनता भरकटली नाही
रावसाहेब दानवे म्हणाले की, "मी देशाच्या जनतेचे आभार मानतो. अनेक पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहिलं, कोणी सायकलवर निघालं तर कोणी हत्तीवर पण जनता भरकटली नाही. राज्यभरातल्या सभांमधून लोकांमध्ये उत्साह दिसत होता."

Exit Poll 2019 Maharashtra : महायुतीला फटका, महाआघाडीच्या काहीच जागा वाढणार

काँग्रेस-राष्ट्रवादी 5 जागांच्या वर जाणार नाही
एबीपी-नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला फटका बसून महाआघाडीच्या काही जागा वाढण्याची शक्यता आहे. याविषयी दानवे म्हणाले की, "महाराष्ट्रात आम्हाला 42च्या वरच जागा मिळणार, 41 होणार नाही. आजपर्यंतचा अभ्यास आहे राष्ट्रवादी काँग्रेस 6 आणि 4 या आकड्यांच्या वर कधी गेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून राज्यात पाच जागांच्या वर जाणार नाही याचा मला विश्वास आहे."

सर्व चॅनेल्सच्या एक्झिट पोल्सचा कल कोणाच्या बाजूने?

मोठा भाऊ-छोटा भाऊ असं काही नाही!
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यातील समान जागेमुळे भाजप आणि शिवसेना आता मोठे-छोटे नाही तर जुळे भाऊ झाल्याची प्रतिक्रिया उमटली. याबद्दल विचारलं असता रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की, "प्रत्येक मतदारसंघात पंतप्रधान मोदी उभे होते, असं शिवसेना-भाजपने एकत्र काम केलं. त्यामुळे मोठा भाऊ, लहान भाऊ असं काही नाही. आम्ही विधानसभेला पण एकत्र लढा देऊ."



एबीपी-नेल्सन एक्झिट पोल : महाराष्ट्रातील अंदाज
शिवसेना-भाजप महायुती राज्यात 34 जागा जिंकणार असल्याचा अंदाज एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात शिवसेना 17, भाजप-17, काँग्रेस-4, राष्ट्रवादी- 9 आणि स्वाभिमानीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत भोपळाही फोडता येणार नाही.

लोकसभेच्या निवडणूक 2014 शी एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोलची तुलना केली, तर भाजपला 6 जागांचा तर शिवसेनेला एका जागेचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या 2 आणि राष्ट्रवादीच्या 5 जागा वाढण्याची शक्यता आहे.

ABP News Exit Polls 2019 Lok Sabha Elections Live Updates: एनडीए पुन्हा सत्तेच्या जवळ, मात्र स्पष्ट बहुमत नाही