शिवानीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "एका सशक्त ऐतिहासिक पात्राची भूमिका साकरणे माझे स्वप्न होते. माझं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. मी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानानवाची गौरवगाथा' या मालिकेत रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारत आहे. या प्रवासाचा मी भाग असणार आहे, त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो. रमाबाई आंबेडकरांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे."
शिवानीला याआधी आपण अनेकदा ग्लॅमरस रुपात पाहिले आहे. ती आता पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका करणार आहे. त्यामुळे ती खूप उस्तुक आहे.
काही दिवसांपूर्वी या मालिकेचे शीर्षकगीत आपल्या समोर आले आहे. आदर्श आणि उत्कर्ष शिंदे यांच्या लेखणीतून हे गाणे तयार झाले आहे. आदर्श शिंदेच्या दमदार आवाजातलं हे गाणं लोकांच्या पसंतीस उतरलं आहे.
लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालेल्या या दोन्ही भावांकडे जेव्हा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी विचारणा झाली तेव्हा दोघांनीही या गाण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं. महामानवाचे विचार शीर्षकगीतातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आव्हानात्मक होतं. आदर्श आणि उत्कर्षने या गाण्यावर बराच अभ्यास आणि वाचन करुन शब्द लिहिले. मालिकेचं टायटल ट्रॅक लिहिण्याची दोघांचीही ही पहिलीच वेळ आहे.
शिवानी रांगोळे