नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकीकडे महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगला. तर दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या आखाड्यात आहे. तिसरीकडे राज ठाकरेंची (Raj Thackeray)महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीदेखील निवडणुकीला सामोरे जात आहे. आज मतदान पार पडल्यानंतर निकालाचा एक्झिट पोल (Maharashtra Exit Polls Result 2024) समोर आला आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुती (Mahayuti) की महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता येणार? कुणाला किती जागा मिळणार? याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यात एकूण 47 विधानसभा मतदारसंघ आहेत. या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रत्येक मतदारसंघामध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली आहे. प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात एक्झिट पोलचा अंदाज...
उत्तर महाराष्ट्रात कुणाला किती जागा?
SAS GROUP HYDRABAD च्या पोलनुसार : (एकूण जागा 35, अहिल्यानगरच्या जागा वगळून)
मविआ 15-16
महायुती 18-21
इतर 2
लोकशाही रुद्रच्या पोलनुसार : (एकूण जागा 47)
भाजप - 14
शिवसेना (शिंदे गट) - 06
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 04
काँग्रेस - 06
शिवसेना (ठाकरे गट ) 06
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 08
झी एआयच्या पोलनुसार : खान्देश (एकूण जागा 35)
महायुती - 15-20
मविआ - 15-20
इतर - 00-01
राज्यात कुणाला किती जागा?
इलेक्टोरल एजच्या पोलनुसार :
भाजप 78
कांग्रेस 60
एनसीपी-एसपी-46
शिवसेना-उबाठा 44
शिवसेना 26
एनसीपी-अजित पवार 14
इतर 20
चाणक्य स्ट्रटेजीज् च्या पोलनुसार :
महायुती - 152-160
भाजप - 90+
शिवसेना (शिंदे गट) 48+
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 22+
इतर - 2+
महाविकास आघाडी - 130-138
काँग्रेस - 63+
शिवसेना (ठाकरे गट) - 35+
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 40+
पोल डायरीच्या पोलनुसार :
महायुती - 122-186
भाजप - 77-108
शिवसेना (शिंदे गट) - 27-50
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28
महाविकास आघाडी - 69-121
काँग्रेस - 28-47
शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39
इतर - 12-29
MATRIZE च्या पोलनुसार :
महायुती 150-170
मविआ 110-130
इतर 8-10
भाजप 89-101
अजित पवार 17-26
शिंदे गट 37-45
कांग्रेस 39-47
उबाठा 21-39
राष्ट्रवादी पवार 35-43
REPUBLIC च्या पोलनुसार :
महायुती 137-157
मविआ 126-146
अन्य 2-8
NEWs 24 P-MARQ च्या पोलनुसार :
महायुती 137-157
मविआ 126-146
इतर 2-8
इतर महत्त्वाच्या बातम्या
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी