Shukra Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र (Venus) ग्रहाला धन-संपत्ती, प्रेम, ऐश्वर्य आणि सुखाचा कारक ग्रह मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह जेव्हा पण आपली चाल बदलतो तेव्हा काही राशींच्या जीवनात आर्थिक सुख, समृद्धी आणि नोकरीत यश मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. 


काही राशींच्या लोकांना प्रचंड धनहानीचा सामना करावा लागतो. वैवाहिक जीवनात तणाव वाढतो तसेच, प्रोफेशनल लाईफवर सुद्धा परिणाम होतो. डिसेंबर महिन्यात शुक्र ग्रह दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने कोणकोणत्या राशींना नुकसान सहन करावं लागणार आहे ते जाणून घेऊयात. 


डिसेंबर महिना शुक्र ग्रह संक्रमण 2024 


2 डिसेंबर 2024 रोजी शुक्र ग्रह शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीत संक्रमण करणार आहे. या दिवशी सकाळी 11 वाजून 46 मिनिटांनी शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशीच्या लोकांना ग्रहण लागणार आहे. 


कर्क रास (Cancer Horoscope)


शुक्राच्या संक्रमणाचा अशुभ प्रभाव कर्क राशीच्या लोकांवर पडणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायात नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. यासाठी घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. तुमच्या कामाचा वाढता ताण येऊ शकतो. तसेच, तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे संबंध बिघडू शकतात. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


शुक्र ग्रहाचा शनीच्या राशीत प्रवेश केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ कठीण असणार आहे. तुम्ही ठरवलेलं काम पूर्ण होणार नाही. तसेच, अचानक तुमचे खर्च वाढू शकतात. तसेच, तुम्ही नियोजित केलेलं काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुमची सतत चिडचिड होत राहील. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ नसणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. तुमचं उत्पन्न घटू शकतं. तसेच, तुमच्या व्यवसायात तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे मित्र देखील तुमच्यापासून दुरावू शकतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :                     


Shani Gochar : नवीन वर्ष 2025 'या' 3 राशींसाठी ठरणार लकी; विविध स्त्रोतांमधून होणार प्रगती, मार्गातील अडथळे होतील दूर