मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मोर्शी विधानसभा मतदारसंघ (Morshi Assembly Constituency) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. कारण मोर्शीचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Ajit Pawar NCP) प्रवेश केला आहे. अजित पवार गटातून तिकीट मिळण्यासाठी देवेंद्र भुयार गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.
आमदार देवेंद्र भुयार हे अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. अजित पवार यांच्यामुळेच मतदारसंघात कोट्यवधींची विकास कामे होऊ शकली, असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोर्शीची जागा मिळावी, यासाठी देवेंद्र भुयार यांनी प्रयत्न केले आहेत. गेल्या निवडणुकीत भुयार यांनी भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. मोर्शीची जागा भाजपला मिळावी, यासाठी डॉ. अनिल बोंडे हे आग्रही आहेत. त्यामुळे महायुतीत अद्याप या जागेचा तिढा कायम आहे.
देवेंद्र भूयारांच्या मनात नेमकं चाललंय काय?
अपक्ष आमदार म्हणून 5 वर्ष अजित पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून देखील पहिल्या यादीत देवेंद्र भुयार यांचे नाव आलेले नाही. मागील 7 दिवसांपासून देवेंद्र भुयार मुंबईत पक्ष प्रवेश आणि एबी फॉर्म मिळेल या आशेने ठाण मांडून बसून होते. मात्र, त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही. यानंतर देवेंद्र भुयार अखेर विधानसभा मतदार संघात निघून गेले आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना व्हाट्सअप स्टेटसच्या माध्यमातून संदेश दिला आहे. ते उद्याच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. देवेंद्र भुयार यांना अद्याप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एबी मिळाला नसल्याने ते अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणार का? अशी चर्चा आता रंगली आहे. तर देवेंद्र भूयारांच्या मनात नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या