मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल अखेर वाजले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून राजन विचारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. राजन विचारे (Rajan Vichare) यांनी गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

राजन विचारे हे 2009 मध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे गटाने माजी खासदार राजन विचारे यांनाच ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरताना राजन विचारे यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. त्यानुसार राजन विचारे यांच्याकडे जवळपास 26 कोटी रुपयांची संपत्ती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राजन विचारे यांच्या कर्जात वाढ झाल्याचे देखील दिसून येत आहे. 

राजन विचारेंची संपत्ती किती? 

एकूण संपत्ती - 25,82,97,000

(2024 लोकसभेत असलेली एकूण संपत्ती : 25,82,97,000) 

राजन विचारे यांची संपत्ती लोकसभेइतकीच असल्याचे दिसून येत आहे. 

राजन विचारेंची संपत्ती 

लोकसभा (2024 मधील संपत्ती) 

विधानसभा (2024 मधील संपत्ती)

रोख रक्कम 

पत्नीकडे 

1,20,000

60,000

1,00,000

50,000

जंगम 

पत्नीकडे

1,32,55,125

2,40,32,502

2,40,85,976

3,28,20,548

स्थावर 

पत्नीकडे 

5,64,45,503

74,56,420

5,64,45,503

74,56,420

कर्ज

पत्नीकडे

3,24,78,884 

94,20,232 

4,46,30,338

1,93,00,341

वारसा हक्काने  16,94,631 16,94,631

दाखल गुन्हे - 06

वाहने - राजन विचारे यांच्याकडे हुंदाई वेरणा, पत्नी नंदीनीच्या नावे इनोव्हा क्रीस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ.

शेती - रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन.

सदनिका - ठाण्यातील चरई भागातील रोझ वुड, दिघे चौकात दुकान, मिरा-भाईंदर येथील गौरव गार्डन येथे दोन दुकान, पत्नी नंदिनीच्या नावे जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूर निवासमध्ये दुकान.

राजन विचारे यांची मालमत्ता - (2019 सालची) 

  • एकूण संपत्ती - 14,59,80,198
  • जंगम मालमत्ता - 2,01,15,200
  • पत्नी नंदिनी  - 2,82,93,363
  • रोख रक्कम - 2,00,000
  • वारसा हक्काने - 9,00,000
  • कर्ज - 4,18,57,461
  • गुन्हे - 9 ‌फौजदारी गुन्हे

वाहने - फोर्ड एंडेवर, मर्सिडीज बेंझ, 
पत्नी नंदीनीच्या नावे-  टोयोटा फोर्चुनर, इनोव्हा क्रीयस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ.

शेती - रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन.
सदनिका - ठाण्यातील चरई भागातील रोझ वुड आणि जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, पत्नी नंदिनीच्या नावे जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूरनिवासमध्ये दुकान.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Mayuresh Wanjale: 'मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर...'; मयुरेश वांजळेही भावूक, नेमकं काय घडलं?, सर्व सांगितलं!

Amit Thackeray: 'माहीम विधानसभा साहेबांना भेट देणार'; शिंदेंच्या उमेदवारावर रोख, अमित ठाकरेंचं भाषण गाजलं!