Maharashtra Assembly election 2024: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परळीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गुरुवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी त्यांनी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना कोणताही थाट, बडेजाव आणि शक्तीप्रदर्शन करायचं त्यांनी टाळलं. दरम्यान,यावेळी भाजप नेत्या आमदार पंकजाताई मुंडे यांच्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना व घटकपक्ष महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होते.


 पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ 


उमेदवारी अर्ज भरताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्याकडे जवळपास 53.80 कोटी रुपयांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. 


मंत्री धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ झालीय. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे. गुरुवारी धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दरम्यान दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीची माहिती नमूद करण्यात आली आहे.


 15 कोटींची वाहने, दीड किलो चांदी, 23 लाखांचे दागिने


धनंजय मुंडे यांच्याकडे 2019 मध्ये 23 कोटींची संपत्ती होती. तर 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात 53.80 कोटींची संपत्ती नमूद करण्यात आली आहे. पाच वर्षांमध्ये मुंडेंच्या संपत्ती सुमारे 31 कोटी रुपयांनी वाढली आहे. धनंजय मुंडे त्यांची पत्नी आणि कुटुंबाकडे 53 कोटी 80 लाखांची संपत्ती आहे. मागील पाच वर्षात यामध्ये दुपटीने म्हणजे 30.75 कोटी रुपयांची वाढ झालीय. 2019 मध्ये त्यांच्याकडे 23 कोटींची संपत्ती होती. धनंजय मुंडे यांच्याकडे 15 कोटींची वाहने, दीड किलो चांदी आहे. तर त्यांच्या नावे 15 कोटी 55 लाख 5 हजार 105 रुपयांचे विविध वाहने आहेत. त्यात अगदी टँकर पासून ते बुलेट पर्यंतच्या सात वाहनांचा यात समावेश आहे. सात लाख तीन हजार रुपयांचे 190 ग्रॅम सोने आहे.


धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुनील गुट्टे यांनी शरद पवार गटाकडून दंड थोपटले


धनंजय मुंडे यांनी 2019 च्या वचननाम्यातील शब्द पाच वर्षात पाळले नाही. मंत्री पदाचा फायदा फक्त वैयक्तिक झाला. धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुनील गुट्टे यांनी केलाय. शेतकरी संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


मुंडेंचा वचन नामा फेल झाला. परळी मतदारसंघात शेतकरी बेरोजगार विद्यार्थी यासर्वांचे प्रश्न तसेच आहेत. शंभर टक्के लोकांचा विकास झालेला नाही. मूलभूत प्रश्न तसेच आहेत. मतदारसंघात मोठी दादागिरी आहे. ३५४ चे कलम इथल्या सगळ्या लोकांना माहित आहे. अनेक लोक जेलमध्ये गेले आहेत. परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत आहे. 2019 च्या वचननाम्यातील वचनांची काय पूर्तता केली. जाहीर भाषणातून सांगावे. असे आवाहन गुट्टे यांनी दिले आहे. 


हे ही वाचा