Rahu Nakshatra Parivartan 2024 : ज्योतिषशास्त्रात राहूचं (Rahu) वर्णन पापी ग्रह असं केलं जातं. राहू वेळोवेळी राशी बदलतो., नक्षत्र बदलतो, ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. राहू सामान्यतः नकारात्मक मानला जातो, पण तो कुंडलीत शुभ स्थितीत असेल तर गरिबाला राजा बनवू शकतो. यावेळी राहू मीन राशीमध्ये स्थित आहे, तो उत्तराभाद्रपदात स्थित आहे. मार्च 2025 पर्यंत तो या नक्षत्रात स्थित राहील. मित्र शनीच्या नक्षत्रात राहू असल्यामुळे राहू खूप शक्तिशाली झाला आहे. त्यामुळे हा काळ 3 राशींसाठी भाग्याचा असणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
राहूच्या चालीतील बदल मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. हा नक्षत्र बदल या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल. या राशीच्या लोकांना या काळात खूप फायदा होऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. यासोबतच करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. कामाच्या संदर्भात तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो, पण यातून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात.
कुंभ रास (Aquarius)
राहूचा नक्षत्र बदल या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. शनीच्या नक्षत्रात राहूची उपस्थिती तुमचं जीवन आनंदाने भरेल. तुम्ही अधिकाधिक पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. हरवलेले किंवा अडकलेले पैसे परत मिळू शकतात. यासोबतच तुम्ही भविष्यासाठी बचतही कराल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत सुरू असलेल्या वादातून सुटका मिळेल. यासोबतच वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. बिझनेस करणाऱ्या लोकांनाही भरपूर फायदा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात.
कर्क रास (Cancer)
राहूच्या नक्षत्रातील बदल या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या राशीमध्ये राहू भाग्याच्या घरात स्थित आहे. मित्राच्या नक्षत्रात असल्यामुळे राहू अत्यंत शक्तिशाली होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला जीवनात यश मिळेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. या काळात तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. या काळात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात, तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani 2024 : शनीचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; मेषसह 'या' 5 राशींचे होणार हाल, कोसळणार अडचणींचा डोंगर