मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने बंडखोरी करणाऱ्या अनेक नेत्यांची हकालपट्टी केली होती. तर काँग्रेसमध्ये (Congress) अनेक नेत्यांनी बंडखोरी इल्याचे दिसून आले आहे. आता बंडखोरांविरोधात काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारला आहे.
ज्या कांग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे. यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक (Rajendra Mulak), काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार (Yajnavalkya Jichkar), पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल (Aaba Bagul) आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे (Kamal Vyavhare) यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
जयश्री पाटलांवरही कारवाई
तर सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या वसंतदादा गटाने जयश्री पाटील (Jayshree Patil) यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्याला आता खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी जाहीर पाठिंबा दिला. आता जयश्री पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
काय म्हणाले रमेश चेन्निथला?
काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी म्हटलंय की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच गॅरंटी आम्ही काल जाहीर केल्या आहेत. भारताचं भविष्य उज्वल करण्यासाठी या गॅरंटी महत्त्वाच्या आहेत. 13,16 आणि 17 नोव्हेंबरला प्रियंका गांधी महाराष्ट्रात येत आहेत. मल्लिकार्जुन खरगे पाच दिवस महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. ज्या कांग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे त्यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. आम्ही गॅरंटी दिलेल्या आहेत. महाविकास आघाडीचा जाहीरनामा 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. मुंबईत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), संजय राऊत (Sanjay Raut), जयंत पाटील (Jayant Patil), नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या