मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात विद्यमान आमदार अजय चौधरी (Ajya Chaudhari) आणि सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांच्यात उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळाली. मात्र, उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे सुधीर साळवी नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर सुधीर साळवींना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मातोश्रीवर बोलावले होते. मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंकडून सुधीर साळवींच्या दिलजमाईचे प्रयत्न करण्यात आले. आता अजय चौधरी आणि सुधीर साळवी एकत्र चर्चा करतानाचा फोटो समोर आला आहे. यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंचं टेन्शन मिटल्याचं दिसून येत आहे. 


शिवडी विधानसभा मतदारसंघात झालेल्या नाराजीनाट्यानंतर अजय चौधरी आणि सुधीर साळवी एकत्र आले आहेत. अजय चौधरी आणि सुधीर साळवी एकत्र चर्चा करतानाचा फोटो समोर आला आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या अजय चौधरी हे आपला उमेदवारी अर्ज भरतील. अजय चौधरी यांना शिवडी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी इच्छुक असलेले सुधीर साळवी यांनी त्यांची भेट घेतली. 


अजय चौधरी-सुधीर साळवींची भेट


खरंतर सुधीर साळवी यांना तिकीट न मिळाल्याने काहीशी नाराजी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र सुधीर साळवी आपल्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढत आपण पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणार असल्याची भूमिका घेतली. मी शिवसेनेत अनेक वर्ष काम केलेलं आहे. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचाराने काम केलं आहे. मी आयु्ष्यात कधी राजकारण केलं नाही. मी यावेळी शिवसेनेची उमेदवारी मागितली होती त्यानंतर ज्या पद्धतीने प्रवास पुढे गेला, त्या प्रवासात तुम्ही सगळ्यांनी मला जी साथ दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांना दंडवत घालतो. मला उमेदवारी न मिळाल्याने तुम्हालाही त्रास झालेला आहे. पण मी आज तुम्हाला सांगतो की, तुमच्या प्रत्येकाच्या मनातला आमदार हा सुधीर साळवी आहे. मी कालही पक्षासोबत होतो, आजही आहे आणि उद्याही पक्षासोबत राहणार, असं सुधीर साळवी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यासोबत चर्चा करून प्रचार रणनीती ठरवली. दोघांनी एकत्रित येऊन शिवसेना ठाकरे गटाला शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये जिंकून आणण्याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. 


आणखी वाचा 


अभिनेत्रीचा पती राष्ट्रवादीत, फहाद अहमदला मुंबईतील उमेदवारी; जयंत पाटलांनी सांगितलं राज'कारण'