रायगड: रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून अपक्ष उमेदवाराचा प्रचार करण्याऱ्या कार्यकर्त्याला धमकी दिल्याचं समोर आलं आहे. अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. महेंद्र थोरवे यांच्यासंदर्भात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करणार सुधाकर घारे म्हणाले. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
कर्जत मतदारसंघात प्रचार प्रसार रॅली जोरदार निघत आहेत. कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार आणि महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांची कर्जत मधील कडाव बाजारपेठेत प्रचार रॅली निघाली होती. यावेळी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा प्रचार करत असताना 75 वर्षाच्या मनोहर पाटील यांनी महेंद्र थोरवे यांना हात जोडले, यावेळी थोरवे यांनी माझे काम कर म्हणत या कार्यकर्त्याला चक्क धमकी देत त्यांच्यावर शिव्यांचा भडिमार देखील केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला.
प्रत्येकाने आपापल्या उमेदवाराचा प्रचार करावा असे मनोहर पाटील यांनी यावेळी आमदार थोरवे यांना म्हटल्यावर थोरवे यांनी पुन्हा धमकी देण्यास सुरूवात केल्याचं सबंधित व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत आहे. माझ्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला धमकी देत आमदार थोरवे यांनी त्यांचं स्वतःच भान विसरून अपशब्द वापरणे कितपत योग्य असा सवाल उपस्थीत केला जातोय.
मनोहर पाटील काय म्हणाले?
मनोहर पाटील म्हणाले, विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांची रॅली आली, माझे त्यांचे पूर्वीपासून संबंध होते. त्या हिशोबानं त्यांनी मला नमस्कार केला,मी त्यांना नमस्कार केला, त्यानंतर हात मिळवल्यानंतर त्यांनी मला अपमानित करणारे शब्द वापरले. मी तुम्हाला मदत केली तुम्ही माझं काम करा असं त्यांनी मला म्हटलं. मी त्यांना म्हटलं मी माझ्या पक्षाचं काम करणार असल्याचं म्हटलं, ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याचा पक्षाचं काम करावं. यानंतर ते म्हणाले बघून घेईन. माझ्या सारख्या 70 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला धमकावत असतील तर काय अवस्था होईल, याचा विचार सर्वसामान्यांनी करावा, असं मनोहर पाटील म्हणाले.
कर्जत खालापूरचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी 70 वर्षाच्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी धमकी देताना पाहायला मिळालं, असं म्हटलं. लोकांना या आमदाराला घरी बसवण्याची संधी मिळालीय असं, सुधाकर घारे म्हणाले. निवडणूक आयोगाला आणि पोलीस यंत्रणेला महेंद्र थोरवेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करतोय, असं म्हटलं.
इतर बातम्या :