Nandurbar Vidhan Sabha Election Results 2024 Winners List: नंदुरबार (Nandurbar) मतदारसंघाला भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हटलं जातं. नंदुरबार विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपेकीपैकी तिसरा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडले, तर आज 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होत आहेत. निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
(ही यादी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या माहितीनुसार अपडेट होत आहे. ताज्या अपडेट्ससाठी ही बातमी रिफ्रेश करत राहा)
नंदुरबार जिल्ह्यातील 4 मतदारसंघात कोण बाजी मारणार?
1. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ,
के.सी पाडवी - काँग्रेस.
आमश्या पाडवी - शिवसेना (शिंदे गट).
हिना गावित - भाजपा - बंडखोर.
पदमाकर वळवी - भारतीय आदिवासी पार्टी.
चौरंगी लढत - या विधानसभा मतदार संघात भाजपच्या माजी खासदार हिना गावित यानी महायुतीचा उमेदवार समोर बंडखोरी केल्याने अडचणीत वाढ झाली आहे. ज्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत गावित यांना साथ दिली होती, त्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून आला होता. या मतदारसंघात चौरंगी लढत आहे.
2. शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघ
राजेश पाडवी - विद्यमान आमदार - भाजपा.
राजेंद्र कुमार गावित - काँग्रेस
दुरंगी लढत - या मतदारसंघात दुरंगी लढत होत असून काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकमेकांच्या समोर आहे,
3. नंदुरबार विधानसभा मतदार संघ,
डॉ विजयकुमार गावित - भाजपा.
किरण तड़वी - कांग्रेस.
दुरंगी लढत - या मतदारसंघात दुरंगी लढत होत असून काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकमेकांच्या समोर आहे
4. नवापुर विधानसभा मतदार संघ,
शिरीष नाईक - काँग्रेस.
भरत गावित - राष्ट्रवादी (अजित पवार गट).
शरद गावित - अपक्ष.
तिरंगी लढत - या मतदारसंघात तिरंगी लढत असून अपक्ष उमेदवार शरद गावित राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे लहान बंधू आहेत. या मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या समोर महायुती आणि अपक्ष उमेदवाराच्या आव्हान जाणार आहे.
यंदा 72.33 टक्के मतदान
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर या चार विधानसभा मतदारसंघांत एकूण 31 उमेदवार रिंगणात होते. यावेळी 72.33टक्के मतदान झाले आहे. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 5.96 टक्के अधिक तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या तुलनेत 1.68 टक्के अधिक मतदान झाले आहे. हे अधिकचे मतदान कोणत्या पक्षाची धाकधूक वाढवणार हे निकालातून लवकरच स्पष्ट होणारच आहे. 2019च्या तुलनेत शहादा मतदारसंघात मात्र कमी मतदान झाले आहे. तर चुरशीची लढत असलेल्या नंदुरबार, नवापूर आणि अक्कलकुवा येथे मतदानाचा टक्का वाढला आहे. यातील मतदारसंघातील वाढलेला टक्का अनेक उमेदवारांची धाकधूक वाढवणार आहे.
(Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.)
हेही वाचा>