Maharashtra Election Results 2024 Chhatrapati Sambhajinagar Winners List:महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीाचा २३ नोव्हेंबरला निकाल लागला. २८८ जागांवर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती झालेल्या लढतीत भारतीय जनता पक्षानं १३५ जागांवर कमळ फुलवलं. शिंदेंच्या शिवसेनेनं ५७ ठिकाणी धनुष्यबाण रोवला.तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ४१ मतदारसंघात घड्याळ लावल्याचं दिसलं. दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे विरुद्ध शिंदे लढतीत मतदारांचा कौल महायुतीलाच होता. कोणत्या मतदारसंघात कोण निवडणून आलं? छत्रपती संभाजीनगरच्या ९ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पहा..
1)औरंगाबाद पूर्व मतदारसंघ
लहू शेवाळे (काँग्रेस)-12568
अतुल सावे (भाजप)- 93274
इम्तियाज जलील (MIM)-91113
विजयी उमेदवार-अतुल सावे +2161
2)औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ
राजू शिंदे (शिवसेना- यूबीटी)106147
संजय शिरसाट (शिवसेना)122498
विजयी उमेदवार- संजय शिरसाट
(+16351)
3)औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ
बाळासाहेब थोरात (शिवसेना- यूबीटी)37098
प्रदीप जैस्वाल (शिवसेना)85459
विजयी उमेदवार-प्रदीप जैस्वाल
(+ 8119)
4)फुलंब्री मतदारसंघ
विलास औताडे (काँग्रेस)102545
अनुराधा चव्हाण (भाजप) 135046
विजयी उमेदवार- अनुराधा चव्हाण
(+32501)
5)सिल्लोड विधानसभा मतदारसंघ
सुरेश बनकर (शिवसेना- यूबीटी)135540
अब्दुल सत्तार अब्दुल नबी (शिवसेना)137960
विजयी उमेदवार- अब्दुल सत्तार
(+ 2420)
6)गंगापूर मतदारसंघ
सतीश चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी)120540
प्रशांत बंब (भाजप) 125555
विजयी उमेदवार-प्रशांत बंब (+5015)
7)वैजापूर मतदारसंघ
दिनेश परदेशी (शिवसेना- यूबीटी)91969
रमेश बोरनारे (शिवसेना)133627
विजयी उमेदवार- रमेश बोरनारे
(+ 41658)
8)पैठण विधानसभा मतदारसंघ
दत्ता गोर्डे (शिवसेना- यूबीटी) 103282
विलास भुमरे (शिवसेना 132474
विजयी उमेदवार- विलास भुमरे
(+ 29192)
9)कन्नड विधानसभा मतदारसंघ
उदयसिंग राजपूत (शिवसेना- यूबीटी)46510
हर्षवर्धन जाधव अपक्ष
66291
संजना जाधव (शिवसेना) 84492
विजयी उमेदवार-संजना जाधव
(+ 18201)
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच ठरली 'लाडकी'
छत्रपती संभाजीनगरच्या ९ विधानसभा मतदारसंघात महायुतीच लाडकी ठरल्याचं चित्र आहे. औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील यांचा निसटता पराभव करत भाजपच्या अतुल सावेंनी बाजी मारली. तर फुलंब्रीतही भाजपच्या अनुराधा चव्हाण यांनी विजयाची मोहर उमटवली. गंगापूरमधून भाजपकडून उभारलेले प्रशांत बंब विजयी ठरले. तर सिल्लोडमधून अब्दुल सत्तार, वैजापूरमध्ये शिंदेसेनेचे रमेश बोरनारे,पैठणमधून विलास भुमरे, औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट तर कन्नडमधून संजना जाधव हे शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. ९ पैकी ३ ठिकाणी भाजप व ६ ठिकाणी शिंदेसेना असे चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यातच ठाकरे गट भुईसपाट झाल्याचं दिसून आलं. मराठवाड्यातील ४६ जागांपैकी ४० जागांवर महायुती लाडकी ठरली आहे. यात भाजपला २० जागा, शिंदे गटाला १३ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ८ जागा मिळाल्याचे चित्र आहे.
हेही वाचा: