मुंबई : एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होऊन २४ ऑक्टोबरला अंतिम निकाल स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वी एबीपी माझा आणि सी व्होटर यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये जनमताचा कल समोर आला आहे. त्यानुसार राज्यातील समस्यांना सर्वाधिक जबाबदार हे राज्य सरकार आणि मुख्यमंत्री असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या समस्या सोडविण्यासाठी भाजपच सर्वाधिक योग्य असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली होती. अजूनही अनेक भागात पाण्याची समस्या कायम आहे. यामुळे सध्या पाणीपुरवठा हा सर्वात कळीचा प्रश्न आहे. पाणी पुरवठ्याची समस्याच २५.५ टक्के म्हणजे सर्वाधिक आहे. यानंतर उद्योग आणि नोकऱ्या २१.९ टक्के, शेतीचे प्रश्न ११.५ टक्के, रस्ते  १०.६ टक्के , महागाई  ४.४ टक्के , इतर २६.१ टक्के अशा समस्या आहेत.

या समस्यांना राज्य सरकार २२.९ टक्के जबाबदार असल्याचं सर्व्हेतून समोर आलं आहे. तर मुख्यमंत्री १०.४ टक्के, केंद्र सरकार ९.२ टक्के, पंतप्रधान मोदी ५.५ टक्के, आमदार, खासदार ९ टक्के , इतर ४३ टक्के जबाबदार आहे.

मात्र या समस्यांवर उपाय हा मात्र भाजपच काढू शकेल असा सर्व्हेचा अंदाज आहे.  भाजप ३३.३ टक्के प्रमाणात समस्या सोडवू शकेल असा सर्व्हेचा अंदाज आहे. तर शिवसेना ५.९ टक्के, काँग्रेस १५.३ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस ८.८ टक्के,  मनसे १.८ टक्के प्रमाणात समस्या सोडवू शकेल असा सर्व्हेचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात सध्या सर्वात कळीचा प्रश्न कोणता?

पाणी पुरवठा - २५.५ टक्के

उद्योग आणि नोकऱ्या - २१.९ टक्के

शेतीचे प्रश्न- ११.५ टक्के

रस्ते - १०.६ टक्के

महागाई - ४.४ टक्के

इतर - २६.१ टक्के

महाराष्ट्रातील सध्याच्या प्रश्नांना कोण जबाबदार ?

राज्य सरकार - २२.९ टक्के

मुख्यमंत्री - १०.४ टक्के

केंद्र सरकार - ९.२ टक्के

पंतप्रधान मोदी - ५.५ टक्के

आमदार, खासदार - ९ टक्के

इतर - ४३ टक्के

राज्यातील समस्या कोणता पक्ष सोडवू शकेल? 

भाजप - ३३.३ टक्के

शिवसेना - ५.९ टक्के

काँग्रेस - १५.३ टक्के

राष्ट्रवादी काँग्रेस - ८.८ टक्के

मनसे - १.८ टक्के

कुणीच नाही - १३.९ टक्के

सांगता येत नाही - १७.२ टक्के

इतर - ३.८ टक्के

Maharashtra Assembly Election Opinion Poll । राज्यात भाजपचीच सत्ता येणार, एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेचा अंदाज 

दरम्यान, यंदाही महाराष्ट्रात भाजपची सत्ता येण्याची शक्यता सर्वाधिक दिसते आहे. ५५.१ टक्के लोकांनी भाजपची सत्ता येईल या बाजूने कल दिला आहे. तर शिवसेनेला ८.२ टक्के , काँग्रेसला ११.९ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला ८.२ टक्के, इतर ९ टक्के असा कल या सर्व्हेमध्ये देण्यात आला आहे. तर ७.८ टक्के लोकांनी सांगता येत नाही असं सांगितलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 ची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात 21 ऑक्टोबरला मतदान होईल. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत याबाबत घोषणा केली.   

या निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येईल ?

भाजप - ५५.१ टक्के

शिवसेना - ८.२ टक्के

काँग्रेस - ११.९ टक्के

राष्ट्रवादी काँग्रेस - ८.२ टक्के

इतर - ९ टक्के

सांगता येत नाही - ७.८ टक्के

तुमच्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार होईल?

भाजप - ४४.२ टक्के

शिवसेना - १६.८ टक्के

काँग्रेस - १२.४ टक्के

राष्ट्रवादी काँग्रेस - १४.२ टक्के

इतर - ४.८ टक्के

सांगता येत नाही - ७.६ टक्के