मुंबई :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुलं आज वाजलं आहे. 21 ऑक्टोबर रोजी  मतदान पार पडेल, तर 24 तारखेला स्पष्ट जनमत हाती येईल मात्र मतदानाआधी एबीपी माझावर ओपिनियन पोल अर्थात जनमत चाचणी पाहता येणार आहे. दिवाळीपूर्वीच राज्यात निवडणूक पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 ची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात 21 ऑक्टोबरला मतदान होईल. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत याबाबत घोषणा केली.


एबीपी माझा आणि सी व्होटर यांचा हा ओपिनियन पोल  आज संध्याकाळी 5 वाजता एबीपी माझावर ओपिनियन पोल होणार असून त्याचं नॉनस्टॉप कव्हरेज, विश्लेषण होईल.  ज्यात 288  जागांचा लेखाजोखा सादर केला जाईल. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, व्होट शेअर किती असेल, मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती कोणाला आहे, याचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवला जाईल.

ओपिनियन पोल कुठे पाहाल?

ओपिनियन पोलचा अंदाज आणि विश्लेषणासाठी एबीपी माझाने खास तयारी केली आहे. टीव्हीसह, वेबसाईट (www.abpmajha.in) मोबाईल अॅप (ABP Live) यासारख्या प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

तसंच ओपिनियन पोलसंदर्भातील सविस्तर वृत्त एबीपी माझाच्या वेबसाईटवर वाचता येईल. याशिवाय ABP Live या अॅपवर बातमीचं नोटिफिकेशन येईलच.

लाईव्ह टीवी : abpmajha.abplive.in/live-tv/

वेबसाइट : www.abpmajha.in

यासोबतच सोशल मीडियावरही आम्ही ओपिनियन पोलशी संबंधित प्रत्येक माहिती देणार आहोत

फेसबुक : https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर : @abpmajhatv किंवा  https://twitter.com/abpmajhatv

गुजरात निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा ओपिनियन पोल आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकीसंदर्भातील लेस्टेस्ट, सुपरफास्ट अपडेटसाठी www.abpmajha.in वर लॉग ऑन करा.