मुंबई : एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होऊन  २४ ऑक्टोबरला  अंतिम निकाल स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वी एबीपी माझा आणि सी व्होटर यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये जनमताचा कल समोर आला आहे. त्यानुसार यंदाही महाराष्ट्रात भाजपची सत्ता येण्याची शक्यता सर्वाधिक दिसते आहे. ५५.१ टक्के लोकांनी भाजपची सत्ता येईल या बाजूने कल दिला आहे. तर शिवसेनेला ८.२ टक्के , काँग्रेसला ११.९ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला ८.२ टक्के, इतर ९ टक्के असा कल या सर्व्हेमध्ये देण्यात आला आहे. तर ७.८ टक्के लोकांनी सांगता येत नाही असं सांगितलं आहे.


केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 ची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात 21 ऑक्टोबरला मतदान होईल. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत याबाबत घोषणा केली.   

या निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येईल ?

भाजप - ५५.१ टक्के

शिवसेना - ८.२ टक्के

काँग्रेस - ११.९ टक्के

राष्ट्रवादी काँग्रेस - ८.२ टक्के

इतर - ९ टक्के

सांगता येत नाही - ७.८ टक्के

तुमच्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार होईल?

भाजप - ४४.२ टक्के

शिवसेना - १६.८ टक्के

काँग्रेस - १२.४ टक्के

राष्ट्रवादी काँग्रेस - १४.२ टक्के

इतर - ४.८ टक्के

सांगता येत नाही - ७.६ टक्के