Mallikarjun Kharge on Amit Shah : इंदिरा गांधी (Indira Gandhi) परत आल्या तरी 370 कलम पुन्हा येणार नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह इंदिरा गांधी यांच्यासमोर 'अभी बच्चा है' अशा शब्दात मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमित शाहा यांच्यावर टिका केली.
मोदी यांचे दोनच मित्र ते म्हणजे अदानी आणि अंबानी
मोदी यांचे दोनच मित्र आहेत, ते म्हणजे अदानी आणि अंबानी असा टोला खर्गे यांनी लगावला. देशातील 5 टक्के लोकांकडे 65 टक्के संपत्ती आहे. यावरुन बघून घ्या की त्यांचे मित्र कोण आहेत. हे लोक गरीबांचे विचार कधीही करत नाहीत असे खर्गे म्हणाले. राज्यात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे आकडे अधिकृत असल्याचे खर्गे म्हणाले. मोदी खोट्या लोकांचे सरदार आहेत. खोटं बोलून मत मागू नका. आपल्या विचारधारा सांगा असे खर्गे म्हणाले. पंतप्रधान नेहरुंच्या काळात अनेक मोठे प्रकल्प देशात सुरु झाले आहेत. हरित क्रांती केल्यानंतर काँग्रेस पार्टीमुळं सर्वांना अन्न मिळाले आहे. भाजपाला काहीही केलं नाही ते फक्त बंडलबाज आहेत असे खर्गे म्हणाले.
महाराष्ट्रातील महिलांना महिन्याला 3000 रुपये दिले जाणार
कर्नाटकात महालक्ष्मी योजना सुरु झाली आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातील महिलांना महिन्याला 3000 रुपये दिले जाणार आहेत असे खर्गे म्हणाले. बेरोजगार तरुणांना 4000 हजार रुपये महिना देणार असल्याचे खर्गे म्हणाले. दरम्यान, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान आपल्याला टिकवायचा आहे. संविधान आमच्या हातात असेल तर ते अर्बन नक्षलवाद्याचं प्रतीक आहे असेही खर्गे म्हणाले. शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर, सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्यासारख्या अनेक लोकांनी येथे काँग्रेस रुजवल्याचे खर्गे म्हणाले. महाराष्ट्रमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे शेतमालाच्या भावाचा. अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मोदी सरकारने अनेक टॅक्स लावले आहेत. सोयाबीनच्या हमीभावाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नसल्याचे खर्गे म्हणाले.