Yavatmal Assembly Election 2024 यवतमाळ : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवमताळ जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. या 7 मतदारसंघांपैकी यवतमाळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे. तर, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे.  काँग्रेसनं या ठिकाणी अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर निवडणूक लढवत आहेत. भाजपनं या मतदारसंघात विद्यमान आमदार मदन येरावार यांना पुन्हा संधी दिली आहे. 


मदन येरावार-  बाळासाहेब मांगुळकर पुन्हा आमने सामने


यवतमाळ जिल्ह्याचं मुख्यालय असलेला यवतमाळ विधानसभा मतदारसंघ आहे.1999 पासून कधी काँग्रेस तर कधी भाजप यांच्या ताब्यात होता.  2014 आणि 2019 मध्ये या ठिकाणी दोन वेळा सातत्याने भाजपचे मदन येरावार यांनी मतदारसंघाचं नेतृत्व कले. यावेळी भाजपच्या दुसऱ्या गटाने या मतदार संघ मदन येरावार यांना संधी न देता राजेंद्र डांगे यांना उमेदवारी मिळावी यासाठी मोठी मोर्चे बांधणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी आमदार संदीप बाजुरे यांनी सुद्धा हा मतदार संघ तुतारीला सुटावा यासाठी प्रयत्न केले होते. वंचितचे डॉ. निरज वाघमारे आणि प्रहारचे बिपिन चौधरी सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 


2019 मध्ये काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांचा केवळ 2200 मतांनी पराभव झाला. या मतदार संघात वाढती गुन्हेगारी आणि बेरोजगारी हा प्रामुख्याने गंभीर प्रश्न बनत आहे.  त्यामुळे मतदार भाजला यावेळेस हॅट्रिक मारू देणार की पुन्हा काँग्रेसच्या या निवडणुकीत बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.


लोकसभेला काय घडलं? 


यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून राजश्री पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय देशमुख निवडणूक लढवत होते. संजय देशमुख यांना 99869 मतं मिळाली होती. तर, राजश्री पाटील यांना 97331 मतं मिळाली होती. म्हणजेच महायुती आणि मविआमध्ये कांटे की टक्कर लोकसभेला या मतदारसंघात पाहायला मिळाली. 


यवतमाळमध्ये कोण कोण निवडणूक लढतंय


अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर - काँग्रेस
भाई अमन- बहुजन समाज पार्टी 
मदन येरावार - भाजप
बिपीन चौधरी - प्रहार जनशक्ती पार्टी 
धरम दिलीपसिंग ठाकूर- राष्ट्रीय समाज पक्ष
डॉ. निरज वाघमारे - वंचित बहुजन आघाडी 
शब्बीर खान रहेमान खान- इंडियन नॅशनल लीग
अमरदीप आनंद वानखेडे - अपक्ष 
अमोल कोमावार- अपक्ष
गजानन आडे -अपक्ष
देशा बंजारा- अपक्ष
नंदू घुगे- अपक्ष
प्रशांत ठमके- अपक्ष
बाळासाहेब गावंडे - अपक्ष
मोहन  भोयर - अपक्ष
मनोज गेडाम- अपक्ष
युवराज आडे- अपक्ष
सलीम सा सुलेमान शा- अपक्ष
साहेबराव विष्णू परडखे -अपक्ष 
सुभाष कासार - अपक्ष 
संदीप शिंदे - अपक्ष 


इतर बातम्या :


यवतमाळमध्ये 2019 ला भाजप सेनेचं वर्चस्व, 2024 च्या लोकसभेला मविआची सरशी, विधानसभा निवडणुकीत काय होणार?