Uddhav Thackeray on Dhananjay Mahadik, कोल्हापूर : "दीड हजार रुपये तुम्हाला देतात. काल पर्वा त्यांचा नालायक पाहिला का? त्याला मुन्ना महाडिक म्हणतात. मुन्ना भाई एमबीबीएस मधला मुन्ना दिसतोय. तो मुन्ना महाडिक म्हणाला, ज्यांना आम्ही पैसे दिलेत, त्या महिला आम्ही महाविकास आघाडीच्या सभेत गेल्या तर फोटो काढून ठेवा. तुम्ही महिलांना नोकर समजताय का? महाराष्ट्रातील माता भगिनींना 1500 देता म्हणजे काय त्यांना नोकर समजतात का?" असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. दक्षिण सोलापूरचे ठाकरेंचे उमेदवार अमर पाटील यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
तुम्ही मुंबईत येणार तेव्हा नवाब मलिकला व्यासपीठावर घेणार का?
उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या एका जिल्हाप्रमाख म्हटले तसं भाजपा म्हणजे भामटा जगला पाहिजे. नवीन गुलाबी जॅकेट तुम्ही सोबत घेतलंय त्यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिलीय. ते माझ्या मंत्रीमंडळात मंत्री होते पण त्यांना भाजपने तुरुंगात टाकलं. फडणवीस यांनी दाऊदशी त्यांचे संबंध जोडले आणि ठोस पुरावे आहेत म्हणाले मग आता ते पुरावे कुठं ठोसले? तुम्ही मुंबईत येणार तेव्हा नवाब मलिकला व्यासपीठावर घेणार का? अजित पवार यांना विचारतो की जे तुमच्या उमेदवराला नकरतात त्यांच्या सोबत युतीमध्ये राहता? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
370 काढल्यानंतर यांचे उद्योगपती सोडून किती जणांनी तिथे जागा घेतल्या?
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राहुल गांधी मला बाळासाहेबची नकली संतान म्हणाले नाही ते पाप मोदींनी केलं. 370 जेव्हा हटवलं तेव्हा शिवसेनेने पाठिंबा दिला होता. 370 काढल्यानंतर यांचे उद्योगपती सोडून किती जणांनी तिथे जागा घेतल्या? हिंदू पंडितांवर जेव्हा अन्याय होतं होता काश्मीरमध्ये तेव्हा मोदी आणि शाह कुठे होते? काश्मिरी हिंदू पंडितांमागे फक्त बाळासाहेब ठाकरे होते.तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? मुस्लिम समाज देखील मोठ्या संख्येने आपल्या सोबत आला आहे.
दाढीवाला दाढी खाजवला तरी पैसे पडतात. या पन्नास खोक्यांचा सूड तुम्हाला उगवावे लागेल. गद्दारांना पन्नास कोटी आणि महिलांना फक्त पंधराशे रुपये देतात. मी अमर पाटीलसाठी आलोय पण महाविकास आघाडीसाठी आलोय. मित्रपक्षाना सांगायचं आहे आपण मोठं स्वप्न बघतोय. महाराष्ट्र सामर्थ्य स्वप्न बघतोय असं असताना अपक्ष मांजर आडवं जाऊ देऊ नका, असंही ठाकरे म्हणाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सांगतोय की तुम्ही सोबत आहात. सोलापूर आणि माढा दोन्ही ठिकाणी खासदार आणलेत. प्रणिती शिंदेंनी इथे नाही. तिलाही सांगण आहे, तू प्रचारात उतरलं पाहिजे. मी माझ्या सभा सोडून इथं आलो होतो, तुझ्यासाठी मी आलो होतो. तू आता यांच्यासाठी मेहनत घे, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
फटाके वाजवणाऱ्यांवर चिडले, मोदींनाही लगावला मिश्कील टोला; राज ठाकरेंनी मुंबईतील सभा गाजवली