Wani Assembly Election 2024 : यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघातून झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोथकुलवार (Sanjivreddy Bodkurwar) हे अतिशय भावून झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोदकुलवार यांचे अश्रू अनावर झाले. ज्याला मी नगराध्यक्ष केलं, ज्याच्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. त्याने भाजप पक्षाच्या मोठ्या पदावर असूनही महाविकास आघाडीचा प्रचार केला. त्यानेच माझ्या विरोधात प्रचार केला, असा आरोप करीत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यावर संजीवरेड्डी बोदकुलवार (Sanjivreddy Bodkurwar)यांनी पराभवच खापर फोडले आहे.


संजय देरकर विजयी, भाजपच्या रेड्डींना धक्का


यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. यवतमाळ , राळेगाव, वणी, उमरखेड, पुसद, दिग्रस, आर्णी हे विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात आहेत. यापैकी वणी विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपकडे गेला आहे. भाजपनं या विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना संधी दिली होती. मात्र यात शिवसेनेच्या संजय देरकर यांनी विजय मिळवला. संजय देरकर यांना 94, 618 मतं मिळाली. त्यांनी 15, 560 मतांनी भाजपच्या संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पराभूत केलं.  संजीवरेड्डी बोदकुरवार हे यापूर्वी दोन निवडणुकीत विजयी झाले होते, मात्र त्यांना यावेळी पराभव स्वीकारावा लागला.


विदर्भातील संपूर्ण 62 मतदारसंघाचा निकाल 


१) चंद्रपूर - भाजप 5, काँग्रेस-1


2 )गडचिरोली -
भाजप -1
काँग्रेस -1
अजित पवार -1


3) अमरावती
भाजप 5, 
 युवा स्वाभिमान 1, अजित पवार 1, ठाकरे गट -1


4) यवतमाळ
भाजप - 3,
कॅाग्रेस 1, 
अजित पवार - 1, 
शिंदे - 1 
ठाकरेंची शिवसेना - 1 
 
5) गोंदिया
भाजप 3,
अजित पवार -1


6) भंडारा
भाजपा -1, 
शिंदे सेना १, 
अजित पवार १ 


7) अकोला
भाजप -3 
काँग्रेस -1
उद्धव ठाकरे -1


8) वर्धा
भाजप 4, 
कॅाग्रेस 0



9) बुलडाणा-  
भाजप 4, 
अजित पवार 1
 शिंदे 1,
उद्धव ठाकरे 1


10) नागपुर जिल्हा 
भाजप - 8
काँग्रेस - 3
शिंदे गट - 1


११) वाशिम 
भाजप 2
काँग्रेस -1


१)भाजपा- 39
२)शिवसेना शिंदे-4
३)राष्ट्रवादी अजित पवार -6
४)काँग्रेस-8
५)शिवसेना युबिटी- 4
६)राष्ट्रवादी शरद पवार - 0
७)मनसे - 0
८)इतर -1( युवा स्वाभिमान )



महायुती - 50( युवा स्वाभिमान सह )
मविआ-12
इतर


इतर महत्वाच्या बातम्या